Adrija Roy Engagement : ‘अनुपमा’ या मालिकेतून अद्रिजा रॉयला लोकप्रियता मिळाली. या मालिकेत राही ही भूमिका करणारी अद्रिया रॉय हिने तिचा बॉयफ्रेंड विग्नेश अय्यरशी साखरपुडा केला आहे. अद्रिजाने तिच्या साखरपुड्याचे सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.

‘बेदिनी मोलुआर कोठा’ या बंगाली मालिकेतील भूमिकेने अद्रिजा रॉयने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर तिने हिंदी टीव्ही मालिकांमध्ये पदार्पण केलं. आधी ‘इमली’ आणि नंतर ‘अनुपमा’ मध्ये ती झळकली. आपल्या दमदार अभिनयाने तिने सर्वांची मनं जिंकली. आता, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातही पुढे जात आहे.

२६ वर्षांच्या अद्रिजा रॉयने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या साखरपुड्याचे अनेक फोटो शेअर केले आहेत. एका साध्या ‘हॅलो’ने दोघांची प्रेमकहाणी कशी सुरू झाली आणि ती एका पवित्र प्रेमाच्या नात्यात बदलली, हे तिने सांगितलं. इन्स्टाग्रामवर तिने एंगेजमेंटची घोषणा केली. चाहते तिच्यावर व विग्नेशवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. फोटोंमध्ये तिने लाल कांजीवरम साडी नेसली आहे. त्याचबरोबर तिने मॅचिंग टेम्पल ज्वेलरी घातली आहे. सुंदर मेकअप आणि गजरा माळून तिने तिचा लूक पूर्ण केला.

विग्नेशने साखरपुड्यासाठी निळा कुर्ता निवडला होता. अद्रिजा व विग्नेश दोघेही साखरपुड्याच्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होते. दोघांनी रोमँटिक पोज देऊन फोटोशूट केलं. अद्रिया बंगाली आहे, तर विग्नेश तमिळ आहे. दोघांनी पारंपरिक पद्धतीने साखरपुडा केला.

“मी माझ्या प्रेमाशी साखरपुडा केला. मी विग्नेशला देवाकडे मागितलं होतं.
एका साध्या ‘हॅलो’पासून ते एका पवित्र वचनापर्यंत..माझं मन आनंदी आहे..
माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे,” असं कॅप्शन अद्रिजाने या फोटोंना दिलं आहे.

अद्रिजा व विग्नेशची पहिली भेट

अद्रिजा व विग्नेशची पहिली भेट २०१५ मध्ये एका कॉमन मित्राच्या पार्टीत झाली होती. नंतर ते इन्स्टाग्रामवर चॅटिंग करू लागले. नंतर दोघांमधील जवळीक वाढली. मग ते डेट करू लागले. जून २०२५ मध्ये दोघे पहिल्या डेटवर गेले होते आणि काही महिन्यांतच त्यांनी त्यांचे आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला. २५ जानेवारी २०२६ रोजी विग्नेशच्या फार्महाऊसवर त्यांनी एंगेजमेंट केली.