अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) ‘अनुपमा’ या मालिकेतून घराघरात पोहोचली. सध्या ती तिच्या मालिकेमुळे नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. रुपालीची सावत्र मुलगी ईशा वर्मा गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर आरोप करत आहे. ईशाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत वडील अश्विन वर्मा यांच्यावर टीका केली आहे. लहानपणी ती ज्या मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करत होती, त्याची वडिलांनी खिल्ली उडवल्याचे तिने म्हटले आहे. तसेच गरज असताना साथ न दिल्याचंही तिचं म्हणणं आहे.

ईशा वर्माचा वडिलांवर संताप

ईशा वर्माने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. आता मी २६ वर्षांची झाली आहे, मात्र त्या वेदना आणि आठवणी आजही माझ्याबरोबर आहेत, ज्याचा परिणाम माझ्या भविष्यकाळावर आणि वर्तमानावर होत आहे. त्यांनी मला स्वीकारले नाही. माझ्यावर टीका करणे आणि माझ्या असुरक्षिततेचा फायदा घेण्याचा पर्याय त्यांनी निवडला. त्यांनी कधीही माझी सार्वजनिकरित्या किंवा वैयक्तिकरित्या कधीही माफी मागितली नाही. माझे वडील माझ्याबद्दल जे बोलले, जी प्रतिक्रिया दिली ती ऐकल्यानंतर मला सगळ्यात जास्त दु:ख झाले. माझ्या मानसिक आरोग्याची त्यांनी खिल्ली उडवली. ज्या कमेंट्सचा मी सामना केला, त्यापासून त्यांनी माझे कधीही संरक्षण केले नाही. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात त्यांनी माझी कधीही सुरक्षा केली नाही.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

रुपाली गांगुलीवर आरोप करत ईशा वर्माने म्हटले, “जेव्हा तुम्ही त्यांना मीडियामध्ये पाहता, तेव्हा तुमच्या बऱ्या झालेल्या जखमा पुन्हा उघड होतात. मी हे टाळले आहे, मात्र कधी कधी याकडे लक्ष वेधले जाते. जास्त दु:ख तेव्हा वाटते, ज्यावेळी तुम्ही खोटे बोलून करिअर बनवता आणि त्याबद्दल तुम्हाला थोडेदेखील वाईट वाटत नाही. त्यामुळे मी कोणत्याही गोष्टीची तसेच कोणता बदल होईल याची अपेक्षा ठेवत नाही. स्वत: केलेल्या गोष्टींची जबाबदारी न घेणे आणि त्याकडे असे पाहणे की काही झालेच नाही. गेल्या २४ वर्षांपासून तुम्ही माझ्या आयुष्याकडे असेच बघत आहात.”

इन्स्टाग्राम

याच व्हिडीओमध्ये ईशा वर्माने म्हटले, स्वत:ची गोष्ट सार्वजनिकरित्या सांगण्यासाठी माझा नाइलाज झाला आहे. कारण लोकांना सत्य समजले पाहिजे. कोणालाही वाईट बोलावे किंवा नकारात्मक बोलावे यासाठी मी प्रोत्साहन देत नाहीये. माझ्याकडे कोणतीही पीआर टीम नाही, मी स्वत:साठी बोलत आहे आणि माझी गोष्ट सांगत आहे. ईशाने पुढे म्हटले की, माझ्या बोलण्यामुळे कोणाला, खास करून माझ्या लहान भावाला वाईट वाटले असेल, तर मी माफी मागते. माझ्या मनात तुझ्याविषयी खूप प्रेम आहे. आशा करते पापा तुझ्यासाठी तसेच वडील आहेत, जे माझ्यासाठी आणि आपल्या बहिणीसाठी कधीच नव्हते. आपण सगळे वेगवेगळे मोठे झालो, माझ्याकडे आपला एकत्र असलेला एकही फोटो नाही याचे वाईट वाटते. आपल्या सगळ्यांना एकत्र वाढवणे ही वडिलांची जबाबदारी होती, पण त्यांनी ते केले नाही.”

“माझ्या वडिलांसाठी माझा एक मेसेज आहे. मला वाईट वाटते की हे प्रकरण इतके वाढले. मात्र, कधीही तुम्ही माफी मागितली नाही. तुम्ही माझे कधीही ऐकले नाही. कायम मला गप्प बसवले. मला कायम तिच्या (रुपाली गांगुली) आजूबाजूला असुरक्षित वाटायचे. मी तुम्हाला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र कधीही तुम्ही माझी बाजू घेतली नाही. मला वाटायचे मी तुमच्यासारखीच आहे, मी सगळ्यांना सांगायचे की मोठी झाल्यावर मी माझ्या वडिलांसारखी चित्रपट निर्माती होईन. पण, तुम्ही कधी त्यालाही पाठिंबा दिला नाही.”

व्हिडीओच्या शेवटी ईशा वर्माने म्हटले, “हा कोणत्याही प्रकारचा बदला नाहीये. जर तुम्ही परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली असती, तर आज ही परिस्थिती ओढावली नसती.” रुपाली आणि आश्विन हे एकमेकांसाठीच बनले आहेत, असेही तिने म्हटले.

हेही वाचा: भारताचा पहिला सुपरहीरो ‘शक्तिमान’ पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; कोण साकारणार मुख्य भूमिका? जाणून घ्या

दरम्यान, २०१३ मध्ये रुपाली आणि अश्विनने लग्न केले आहे. त्यांना एक मुलगा आहे. अश्विनने याआधी लग्न केले होते. ईशाने म्हटल्यानुसार, तिच्या आईचे आणि अश्विनचे १९९७ ला लग्न झाले होते. २००८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना दोन मुली आहेत. ईशा सध्या यूएसएमध्ये न्यू जर्सी येथे राहते. आता तिने केलेल्या वक्तव्याची मोठी चर्चा होताना दिसत आहे.

Story img Loader