scorecardresearch

तीन वर्षांमध्येच मोडला संसार, आता ४३व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याने मराठमोळ्या मुलीशी केलं दुसरं लग्न, व्हिडीओ व्हायरल

हिंदी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्याने केलं दुसरं लग्न, फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

तीन वर्षांमध्येच मोडला संसार, आता ४३व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याने मराठमोळ्या मुलीशी केलं दुसरं लग्न, व्हिडीओ व्हायरल
हिंदी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्याने केलं दुसरं लग्न, फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

कलाकार मंडळींचा विवाहसोहळा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. आताही अशाच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचं लग्न चर्चेचा विषय ठरत आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेता रुशद राणाने ४३व्या वर्षी लग्न केलं आहे. गर्लफ्रेंड केतकी वालावलकरबरोबर रुशदने लग्न करत चाहत्यांना पुन्हा एकदा आनंदाची बातमी दिली. गेल्या काही वर्षांपासून रुशद व केतकी एकमेकांना डेट करत आहेत.

आणखी वाचा – रितेश व जिनिलीयाच्या ‘वेड’ची कौतुकास्पद कामगिरी, बॉलिवूड चित्रपटाला मागे टाकत चार दिवसांतच कमावले इतके कोटी

सोशल मीडियाद्वारे रुशद व केतकीच्या लग्नाचे तसेच लग्नापूर्वीच्या विधीचे बरेच फोटो व्हायरल झाले आहेत. या दोघांचा विवाहसोहळा मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने अगदी थाटामाटात पार पडला. केतकी पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये अगदी सुंदर दिसत आहे. तर रुशदने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.

या दोघांच्या विवाहसोहळ्या छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. २०१०मध्ये रुशदचं पहिलं लग्न झालं. मात्र त्याचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. २०१३मध्ये त्याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर रुशद व केतकीची भेट झाली.

आणखी वाचा – Video : मध्यरात्री एकमेकांना भेटले अरबाज खान व मलायका अरोरा, दोघांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

केतकी ही लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’ची क्रिएटीव्ह दिग्दर्शिका आहे. तर रुशदही या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या मालिकेच्या सेटवरच दोघांची भेट झाली. आता या दोघांनी त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 17:41 IST

संबंधित बातम्या