काही कलाकारांबरोबर असे धक्कादायक प्रसंग घडतात, की त्याची भीती मनात बसते. त्यामुळे ते थोडे विचित्र वागू लागतात. ‘अनुपमा’ मालिकेत अनुपमाच्या मैत्रिणीची देविका ही भूमिका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जसवीर कौर साकारत आहे. जसवीरने तिच्या आयुष्यातील एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला आहे. ही घटना आठवून आजही तिच्या अंगावर काटा येतो. कोणीतरी तिचे केस कापून जमिनीत गाडले होते, असा धक्कादायक खुलासा तिने केला आहे.
शुभोजीत घोष यांच्याशी बोलताना जसवीरने सांगितलं की एके दिवशी तिचे केस कापून जमिनीत गाडले होते. ही घटना तिच्यासाठी अत्यंत धक्कादायक होती. कारण नेहमी सावध राहणाऱ्या जसवीरबरोबर असं घडलं होतं. जेव्हा दुसऱ्या दिवशी तिने केस बांधले, तेव्हा मला लक्षात आलं की तिचे केस कापले आहे. केस थोडेच कापले, असं नव्हतं, तर केसांचा एक मोठा पुंजका कापला होता. हे नक्की कोणी केलं असेल, कोणावर संशय घ्यावा हे कळत नव्हतं, कारण असं काहीतरी घडू शकतं यावर जसवीरचा विश्वासच बसत नव्हता.
केस कापून जमिनीत गाडले अन्…
जसवीर म्हणाली, “माझ्याबरोबर एक घटना घडली होती. माझे केस कापून जमिनीत गाडले होते. जेव्हा मी केस वर बांधत होते, तेव्हा केसांचा एक मोठा पुंजका नाहीये, असं मला दिसलं. हे कसं झालं? असा मला प्रश्न पडला. कारण मी गाढ झोपत नाही, त्यामुळे कोणीतरी आलं आणि मला जाणवलं नाही असं शक्य नाही. तरीही माझे केस कापले होते. माझा भाऊ कामासाठी एका महिलेला भेटायला गेला होता, तेव्हा तिने सांगितलं की तुझ्या बहिणीचे केस कापून जमिनीत गाडले आहेत. मी याबद्दल माझ्या भावाला काहीच सांगितलं नव्हतं, त्यामुळे त्या महिलेला हे कसं समजलं, हे पाहून मी थक्क झाले. मग मी त्या महिलेला भेटले आणि विचारलं की तुम्हाला हे कसं माहित? तेव्हा तिने सांगितलं की ही काळी जादू होती.” दरम्यान जसवीरबरोबर हे कृत्य कोणी केलं ते तिला समजलं नाही.
जसवीरला वाटते भीती
जसवीर पुढे म्हणाली, “मला अजूनही खूप भीती वाटते. जेव्हा मी बाहेर जाते किंवा कोणाच्या घरी जाते, तेव्हा तिथे अन्नाचा वास घेऊन मगच मी ते खाते. सॉरी पण मी असं करते.”
जसवीरला भावाने काय सांगितलं?
एका ज्योतिषी महिलेने जसवीरच्या भावाला सांगितलं की, त्याच्या बहिणीचे केस कोणीतरी कापून जमिनीत गाडले आहेत. भावाने ही गोष्ट जसवीरला सांगितल्यावर तिला धक्का बसला, कारण तिने ही गोष्ट कोणालाच सांगितली नव्हती. तिच्या केसांबरोबर कोणीतरी असा प्रकार केला असेल याची तिला पुसटशी कल्पनाही नव्हती.
जसवीर कौर वारिस, मिष्टी, सीआयडी, कथा पारायुमपोल, अनुपमा, घर की लक्ष्मी बेटियां, इश्क का रंग सफेद, कोई मिल गया, कुछ तो है, माय लॉस्ट होम या मालिकांसाठी ओळखली जाते.
