Bigg Boss Marathi Nomination Controversy: बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेशन टास्कमुळे राडा झाल्याचं पाहायला मिळतंय. राकेश बापटने विशाल कोटियनला नॉमिनेट केलं, त्यामुळे मोठा वाद झाला. दोघेही एकमेकांना भिडल्याचंही पाहायला मिळालं. आता ताज्या प्रोमोत तन्वीने नॉमिनेट केल्यामुळे अनुश्री भडकली. तिचा दिपाली सय्यदबरोबर वाद झाला आणि अनुश्रीची जीभ घसरली.

कलर्स मराठीने बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये तन्वी “बिग बॉस माझं तिसरं नाव आहे अनुश्री,” असं म्हणत टीव्ही फोडते. यानंतर भडकलेली अनुश्री म्हणते, “स्वतःच्या लोकांना सेफ ठेवण्यासाठी चांगल्या प्लेयर्सना नॉमिनेट करतेय. तुझ्यासोबत ही तीन टाळकी बसलीये ना त्यांचा प्रॉब्लेम आहे.” हे ऐकताच दिपाली संतापते.

“ए टाळकी-बिळकी बोलायचं नाही हां. नीट शब्द वापर.” त्यावर अनुश्री म्हणते “तुला फक्त बोलायला मुद्दा पाहिजे.” यानंतर दिपाली बोलत असते तेव्हा अनुश्री रागात “अगं ए मंद बदक ऐकून घे,” असं म्हणाली. यानंतर दिपालीचा संतापलेला लूक प्रोमोत पाहायला मिळतो.

Award Banner

पाहा बिग बॉस मराठीचा प्रोमो

एकूणच बिग बॉस मराठीच्या या आठवड्याची सुरुवात गोंधळाने झाली आहे. बिग बॉसचा फिनाले अगदी जवळ आलाय. त्यामुळे आता अगदी शेवटच्या टप्प्यात आल्यावर घराबाहेर जावं लागू नये, यासाठी नॉमिनेशनमध्ये न येण्याचा प्रयत्न स्पर्धक करत आहेत. त्यामुळेच तन्वीने नॉमिनेट केल्याने अनुश्री चिडली आणि दिपालीला नको नको ते बोलली.

बिग बॉस मराठीच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी अनुश्रीची बाजू घेतली, तर काहींनी तन्वीचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. काहींनी अनुश्रीने ज्या प्रकारचे शब्द वापरले त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘अनुश्री स्ट्रॉन्ग आहे’, ‘बिग बॉस त्या अनुश्रीच्या जागी खूप चांगले कलाकार होते इंडस्ट्रीमध्ये, तुम्ही अनुश्रीला घेऊन बिग बॉस शो ची शोभा घालवली आहे … आणि अनुश्रीला जर भाऊंनी अॅक्शन घेतली नाही तर बिग बॉस शो बघण्यासाठी आम्ही पात्र नाही,’ ‘तन्वीचं चुकलं अनुश्री स्ट्राँग आहे,’ ‘अनुश्रीला आणि सागरला पण काढा,’ ‘टोळीला बाहेर काढा,’ ‘तन्वी अनुश्रीला घाबरली,’ ‘अनुश्रीने भाषा सुधारायची गरज आहे, दिपाली सिनियर आहे, तिच्यासमोर अनुश्री काहीच नाही,’ ‘तन्वी फार हुशार आहे या तीन टाळक्यांचा वापर करून पुढे जाईल आणि ही तीन टाळकी बाहेर जाणार हे नक्की,’ अशा कमेंट्स या प्रोमोवर आहेत.