‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या रीलमुळे प्रसिद्ध झालेला बालकाकार साईराज केंद्रे सध्या चर्चेत आहे. साईराजच्या एका व्हायरल रीलमुळे त्याला छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आणि त्याची झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत एन्ट्री झाली. साईराज या मालिकेत अजयची (सिंबा) भूमिका साकारत आहे.

साईराज या मालिकेमुळे आता अधिक चर्चेत आला आहे. साईराज अनेकदा सेटवरील धमाल, मस्ती आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. तो आपल्या ऑनस्क्रिन आईबरोबर म्हणजेच अप्पीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी नाईकबरोबर मजेशीर रील्स बनवत असतो. आता साईराजने त्याचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा… “विश्वास बसत नाही की मी सातव्या महिन्यात…”, ‘या’ अभिनेत्रीने शेअर केला प्रमोशनदरम्यानचा ‘तो’ अनुभव, म्हणाली…

सध्या सगळीकडे पुष्पा-२ चा फिवर पाहायला मिळतोय. ‘अंगारो का…’ या गाण्यावर अनेक इन्फ्लूएन्सर्स तसेच कलाकारदेखील या गाण्यावर थिरकताना दिसतायत. आता साईराजदेखील या गाण्यावर थिरकला आहे. या डान्सचा व्हिडीओ त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

साईराजने या डान्ससाठी काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि गुलाबी रंगाचं जॅकेट आणि निळ्या रंगाची जिन्स घातली आहे. हटके हुक स्टेप करत साईराज या गाण्यावर थिरकला आहे. साईराजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या बालकलाकाराच्या चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा… ठरलं तर मग: बाप-लेकीचं नातं नकळत खुलणार, सायली भरवणार रविराजला घास अन्…, मालिकेत येणार नवा ट्विस्ट, पाहा प्रोमो

एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “किती क्यूट आहेस.” तर दुसऱ्या चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “खूप मस्त सिंबा” तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत सिंबाचं म्हणजेच साईराजचं कौतुक केलं आहे.

सध्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. या मालिकेत अप्पी आणि अर्जुनमध्ये दुरावा आल्यामुळे सिंबा त्यांना जवळ आणायची प्लॅनिंग करतो असा सीक्वेन्स सुरू आहे. अर्जुनच्या साखरपुड्याच्या दिवशी सिंबाला तो त्याचा बाबा म्हणजेच शेहनशा आहे हे कळंत. दुसरीकडे अप्पी आणि अर्जुनमध्ये कायमचा दुरावा निर्माण करण्यासाठी मोना आणि रुपाली त्यांचं कटकारस्थान सुरूच ठेवतात.

हेही वाचा… “जाड किंवा बारीक…”, ट्रोल झालेल्या महिलांसाठी सोनाली कुलकर्णीने दिला मोलाचा सल्ला, म्हणाली…

दरम्यान, साईराजचा ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याने त्याला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतरदेखील त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. आता साईराज ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत अप्पी आणि अर्जुनच्या मुलाची (अजय उर्फ सिंबा) भूमिका साकारत आहे.