टीव्हीवर दररोज प्रदर्शित होणाऱ्या मालिका या प्रेक्षकांच्या जीवानाचा भाग बनतात. मालिकेत पुढे काय होणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली असते. काही मालिका सतत चर्चेत असतात. ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रदर्शित होणारी मालिका ‘अप्पी आमची कलेक्टर'(Appi Aamchi Collector) ही विविध कारणांमुळे सतत चर्चेत असते. आता ‘झी मराठी वाहिनी’ने या मालिकेचा एक प्रोमो सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

‘झी मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये अप्पी मनीमावशीला धडा शिकवणार, असे म्हणताना दिसत आहे.

अप्पी मनी मावशीला शिकवणार जन्माची अद्दल

प्रोमोमध्ये दाखविल्याप्रमाणे, अप्पी अर्जुनला विचारते, “आपल्या घऱी कोण आलंय माहितीय का?’ त्यावर अर्जुन तिला, “कोण आलंय?” असं विचारताना दिसत आहे. त्यावर अप्पी त्याला म्हणते, “मनी मावशी.” त्याचवेळी गेट उघडून मनी मावशी आत येताना दिसते.

अप्पी अर्जुनला म्हणते, मला तिला जन्माची अद्दल घडवायची आहे, मनी मावशीला धडा शिकवायला मलाच मनी मावशी व्हायला लागलं ना तरी चालेल. यानंतर अप्पी मनी मावशीला भरपूर काम देत असल्याचे पाहायला मिळत आहे. ती झोपलेली असताना तिला उठवते. भांडी स्वच्छ करायला देते. या सगळ्यात रागाने मनी मावशी पायाने भांडी ढकलते. भांड्याचा आवाज ऐकू येताच अप्पी घरातून काय झालं असे विचारते. त्यावर मनी मावशी काही नाही, असे म्हणते.

मनी मावशी घरात आल्याने घरात काय बदलणार, अपर्णा खरंच तिला धडा शिकवणार का? मनी मावशीला अद्दल घडविण्यासाठी अप्पी काय करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, अर्जुन आणि अप्पी एकमेकांपासून वेगळे राहत असतात, त्यांच्यात अबोला असतो. अप्पीची पोस्टिंग उत्तराखंडला असल्याने ती तिकडे त्यांच्या मुलाबरोबर सिंबाबरोबर राहते. अप्पी पुन्हा महाराष्ट्रात येते. सिंबा त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतो. तोपर्यंत अर्जूनचे लग्न दुसऱ्या मुलीबरोबर ठरते. मात्र सिंबा आपले प्रयत्न सोडत नाही. शेवटी ते दोघे पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतात.

हेही वाचा : दिवंगत राजेश खन्नांना दिलेली ‘बिग बॉस’ची ऑफर, निर्माते एका एपिसोडसाठी देणार होते तब्बल ३.५ कोटी, पण…

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अर्जुन आणि अप्पीचा मुलगा सिंबामुळे मालिकेची मोठी चर्चा सुरू होती. त्याच्या अभिनयाचे कौतुक होत असलेले सोशल मीडियावर पाहायला मिळत होते.

प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने,”अप्पी मनी मावशीला धडा शिकवणार” अशी कॅप्शन दिली आहे. १८ ऑगस्टला या मालिकेचा एक तासाचा विशेष भाग प्रदर्शित होणार आहे. आता मालिकेत काय घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.