Apurva Gore-Anshuman Joshi Wedding: ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळाली. यापैकीच अपूर्वा गोरे एक आहे. अभिनेत्रीला घराघरात ओळख मिळाली. आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
अपूर्वा गोरे आणि अंशुमन जोशी लग्नबंधनात अडकले
अपूर्वा गोरे व अंशुमन जोशी यांनी लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्रीने नुकतेच सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तिच्या लग्नातील आहेत. श्री व सौ अशी कॅप्शन देत अपूर्वाने हे फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या व अंशुमनच्या लग्नातील खास झलक पाहायला मिळत आहे. अपूर्वाने जांभळ्या रंगाची काठ असलेली हिरवी साडी नेसली आहे. हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मोजके दागिने, नाकात नथ, कपाळावर टिकली, मुंडावळ्या असा तिचा आहे. तर अंशुमनने पांढऱ्या व पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. दोघांचाही लूक खास वाटत असून लक्ष वेधून घेत आहे.
एका फोटोमध्ये दोघेही एकमेकांचा हात हातात धरत जल्लोष करत असल्याचे दिसत आहे. दोघेही हसत असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये अंशुमन अपूर्वाच्या गळ्यात मंगळसुत्र घालत असल्याचे दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये अंशुमन अपूर्वाच्या भांगेत कुंकू भरत असल्याचे दिसत आहे.
अपूर्वाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत असल्याचे दिसत आहेत. “दोघांचेही हार्दिक अभिनंदन”, “वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा”, “खूप सुंदर”, “हार्दिक शुभेच्छा”, अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.
तर आई कुठे काय करतेमधील सह अभिनेत्री आश्विनी महांगडेनेदेखील कमेंट करत अपूर्वाला शुभेच्छा दिल्या आहेत. तिने “अभिनंदन व शुभेच्छा”, अशी कमेंट केली आहे. तर अनेकांनी हॉर्ट इमोजी शेअर केली आहे.
काही दिवसांपूर्वीच अपूर्वाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत अंशुमनबरोबरच्या नात्याची कबुली दिली होती. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाआधीच्या विविध कार्यक्रमांचे फोटो पाहायला मिळाले. ग्रहमख, मेंदीचे फोटोंनी लक्ष वेधले होते. आता अभिनेत्रीचे लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांना आनंद झाल्याचे मिळत आहे.
अपूर्वा गोरे व अंशुमन जोशी यांच्याबरोबरच मराठी कलाविश्वातील आणखी जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. रुमानी खरे व स्तवन शिंदे हेदेखील लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्या लग्नाआधीच्या विधींचे, कार्यक्रमांचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
