छोट्या पडद्यावर सध्या सर्वाधिक चर्चेत अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. ती सध्या बिग बॉसमुळे चर्चेत आहे. अपूर्वा नेमळेकरने झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. यात तिने शेवंता हे पात्र साकारले होते. बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या अपूर्वा नेमळेकर ही कायमच तिच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगताना दिसते. नुकतंच अपूर्वाने तिच्या आयुष्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.

अपूर्वा नेमळेकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये तिने तिला पुन्हा घरी जायचं नसल्याचे सांगितले. माझ्या जगात फक्त मी आणि माझी आई आहे. त्या व्यतिरिक्त जे काही जगं आहे ते मला इथे येऊन समजलंय. त्यामुळे मला घरी जायचं नाही, असे अपूर्वाने म्हटले.
आणखी वाचा : शिवसेनेचा पदाधिकारी, ८ वर्षांचे रिलेशन आणि घटस्फोट, जाणून घ्या अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल…

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
narayan rane marathi news, deepak kesarkar marathi news
वैयक्तिक स्वार्थापोटी अपशकून करत असेल तर पर्वा करणार नाही, नारायण राणे यांचा मित्र पक्षाच्या नेत्यांना टोला
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
How did Swargate get its name in Pune
Pune : पुण्यातील ‘या’ ठिकाणाला स्वारगेट हे नाव कसे पडले? जाणून घ्या ‘स्वारगेट’ नावामागचा इतिहास

अपूर्वा नेमळेकर काय म्हणाली?

फक्त २१ दिवस राहिले आहेत. पण मला घरी जायचं नाही. मी इथे फार आनंदात आहे. मला त्या बाहेरच्या जगात जायचंच नाही. मला या ठिकाणी जी मज्जा आली ती फारच कमाल आहे. माझं बाहेर काहीही नाही. माझ्या जगात फक्त मी आणि माझी आई आहे. त्या व्यतिरिक्त जे काही जगं आहे ते मला इथे येऊन समजलंय. माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडल्यात. ज्यामुळे माझं मन फार खंबीर झालं आहे. यामुळेच मला काही गमवायचं दु:ख नाही. मी आयुष्यात बऱ्याच गोष्टी गमावल्यात. आता त्याचं काहीही वाटत नाही.

मला हे देखील माहिती आहे की मला प्रेमाची गरज नाही. मला प्रेम हवंय, असं काहीही नाही. मी आता जशी आहे तशीच मला खूप आवडते. मी आता फक्त स्वत:साठी जगते. आई आहे म्हणून मला थोडीशी काळजी आहे. त्याव्यतिरिक्त मला इथे जास्त आवडतंय. मला इथे फार मज्जा येतेय. हे १०० दिवस मला बदलण्यासाठी होते असं मला वाटतंय. ७५ दिवस झालेत, त्यावरुन मी बदलले असं मला वाटतंय. माझ्यातली हरवलेली अपूर्वा मला इथे सापडली. मी गेल्या काही वर्षात इतकी हसलेच नव्हते जे आता हसलीय. मजा करतेय, वेडेपणा करतेय, यामुळे मी फार आनंदी आहे, असं तिने म्हटले.

आणखी वाचा : प्रेम, लग्न, घटस्फोट; ‘बिग बॉस’मुळे चर्चेत असलेल्या अपूर्वा नेमळेकरच्या खासगी आयुष्याबद्दल माहितीये का?

दरम्यान बिग बॉस मराठी ४ चा ग्रँड फिनाले येत्या ८ जानेवारी २०२३ ला संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण कलर्स मराठी वाहिनीने याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.