लोकप्रिय अभिनेता अर्जुन बिजलानीने कर्जतमध्ये आलिशान फार्महाऊस बांधलंय. अर्जुनचं हे ‘ड्रीम होम’ आहे. सुमारे १२,००० स्क्वेअर फीट क्षेत्रफळ असलेल्या या प्रॉपर्टीमध्ये १,००० स्क्वेअर फीटची मोठी बाग आहे. हा संपूर्ण व्हिलाची थीम पांढऱ्या रंगा आहे. यात ग्रीक आणि मेडिटेरेनियन आर्किटेक्चरची झलक दिसते. या ‘तारा व्हिला’ (Tara Villa) मध्ये प्रायव्हेट स्विमिंग पूल, जॅक्युझी आहे. तसेच बाहेरील परिसर खूपच नयनरम्य आहे.
अर्जुनने व्हिलाचे नाव ‘तारा’ का दिले?
मुंबईतील घर अर्जुनच्या घराचे नाव शक्ती आहे. शक्ती हे अर्जुनच्या आईचं नाव आहे. तर कर्जतच्या या व्हिलाचे नाव त्याची पत्नी नेहाच्या आई-वडिलांच्या नावावरून ठेवले आहे आई – तनुजा आणि वडील -राकेश यांच्या नावावरून तारा नाव ठेवलंय.
व्हिलाच्या मुख्य दारावर ‘ईव्हिल आय’ आणि पंचमुखी हनुमानाची मूर्ती बसवली आहे. लिव्हिंग रूमच्या भिंती, पडदे आणि सोफे सर्व पांढऱ्या रंगाचे आहेत. इथे फक्त निळ्या, लाल आणि पांढऱ्या रंगाचे एक कार्पेट ठेवले आहे.

व्हिलाच्या प्रवेशद्वाराजवळ एक सुंदर सिटिंग एरिया आहे, जिथे विविध कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. अर्जुनने गमतीत सांगितलं की, कॉन्ट्रॅक्टरच्या महागड्या डिझाईनऐवजी त्याच्या पत्नीने स्वतः वस्तू आणून इथे लाखो रुपयांची बचत केली.
लिव्हिंग रूमचे डिझाईन अर्जुनने स्वतः केले आहे. त्यात एक कंफर्टेबल रिक्लायनर सोफा आहे, तसेच इथे एक छोटे किचन देखील आहे.
व्हिलाची थीम ग्रीक शैलीवर आधारित असली, तरी त्यात भारतीय संस्कृती जपलीआहे. घरात गृहप्रवेशाचा कलश आणि लक्ष्मी-गणेशाची मूर्ती स्थापन केली आहे. मोठ्या खिडक्यांतून बाहेरचे सुंदर डोंगर दिसते.
पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये पांढऱ्या, ऑफ-व्हाइट आणि ऑलिव्ह ग्रीन रंगाचा वापर केला आहे. या बेडरूमला जोडून एक ड्रेसिंग रूम आणि खासगी टेरेस आहे, तिथून डोंगरांचा निसर्गरम्य नजारा दिसतो.

टेरेसवर काळ्या-पांढऱ्या पॅटर्नची फरशी, नेव्ही-ब्लू सोफे आणि झाडं लावली आहेत. पावसाचा आनंद घेण्यासाठी अर्जुनने इथे ‘कबाना’ शैलीत जॅक्युझी बनवली आहे, इथे कुटुंबासोबत निवांत वेळ घालवता येतो.

व्हिलाच्या बाहेरील भागात हिरवीगार लॉन, स्विमिंग पूल आणि मैदानी खेळांसाठी मोकळी जागा आहे. बागेत शांततेचे प्रतीक असलेली बुद्धांची मूर्ती आणि छोटेसे किचन गार्डन देखील बनवले आहे.

रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईमुळे हा व्हिला एखाद्या दुबई किंवा ग्रीसमधील रिसॉर्टसारखा दिसतो. इथे पार्टीसाठी भरपूर जागा आहे.

हा व्हिला बांधण्यासाठी अर्जुनला ३ वर्षे लागली. सकाळी शूटिंग पूर्ण करून संध्याकाळी तो स्वतः इथे यायचा आणि सगळं काम बघायचा. आधी त्याने फक्त एकच प्लॉट घेतला होता, पण नंतर दुसरा प्लॉटही खरेदी केला. एका प्लॉटवर व्हिला बांधला असून दुसऱ्या प्लॉटवर १५० हून अधिक लोक एकत्र येऊ शकतील अशी मोठी लॉन बनवली आहे.
