scorecardresearch

Video: काजोलबरोबर रोमान्स करणाऱ्या मराठमोळ्या गश्मीर महाजनीची सर्वत्र चर्चा; नेटकरी म्हणाले, “शाहरुखपेक्षा…”

गश्मीर महाजनी याने काजोलबरोबर ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटातील एक सीन रिक्रिएट केला.

kajol gashmir

छोट्या पडद्यावरील ‘झलक दिखला जा’ या शोच्या दहाव्या सीझनला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या पर्वात मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि मराठी चित्रपटसृष्टीतील हॅंडसम हंक अशी ओळख असलेला अभिनेता गश्मीर महाजनीही स्पर्धक म्हणून सहभागी झाले. अमृता काही दिवसांपूर्वीच या शोमधून एलिमिनेट झाली तर गश्मीर या स्पर्धेच्या फिनालेमध्ये पोहोचला आहे. नुकतीच या शोमध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिने हजेरी लावली. यावेळी गश्मीर महाजनी काजोलबरोबर रोमान्स करताना दिसला.

‘झलक दिखला जा’च्या मंचावर गश्मीरने त्याच्या नृत्याबरोबरच त्याच्या अभिनयानेही सर्वांना भुरळ घातली आहे. आता या कार्यक्रमाच्या नवीन भागात काजोलने ‘झलक दिखला जा’च्या मंचावर तिच्या आगामी ‘सलाम वेंकी’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने हजेरी लावली. यावेळचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : अरिजित सिंग लाइव्ह कॉन्सर्टच्या एका तिकिटाची किंमत तब्बल १६ लाख! नेटकरी म्हणाले, “इतके पैसे देऊन तिथे रडण्यापेक्षा…”

यात गश्मीर महाजनी याने काजोलबरोबर ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटातील एक सीन रिक्रिएट केला. मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीने ‘झलक दिखला जा’च्या मंचावर काजोलसोबत ‘डीडीएलजे’मधील एक गाजलेला डायलॉग म्हटला. यानंतर थेट शाहरुखसोबतच त्याची तुलना व्हायला लागली आहे.

हेही वाचा : “तू तुझ्या आयुष्याचा सुलतान…” माधुरी दीक्षितने केले गश्मीर महाजनीचे कौतुक

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत महाजनी, काजोल आणि करण जोहर ‘डीडीएलजे’मधील एक गाजलेला सीन रिक्रिएट करताना दिसत आहेत. यावेळी गश्मीरने “बडी बडी देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं सेनोरिटा” हा डायलॉग म्हटला. या व्हिडीओतील गश्मीरचा अंदाज बघून सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत. तसंच अनेक जण त्याची तुलना शाहरुखशी करत त्याने शाहरुखपेक्षाही छान डायलॉग म्हटला असं म्हणत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 16:59 IST
ताज्या बातम्या