लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अविका गौरने तीन महिन्यांपूर्वी तिचा बॉयफ्रेंड मिलिंद चांदवानीशी लग्न केलं. आता दोघांकडेही एक आनंदाची बातमी आहे. अविकाने स्वतःच याबद्दल सांगितल्याने आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. मिलिंद व अविका युट्यूबवर व्लॉग बनवतात. आता नव्या व्लॉगमध्ये अविकाने २०२६ मध्ये तिच्या आयुष्यात एक मोठा बदल होणार आहे, असं सांगितलं. अविकाने असं म्हटल्यावर ती गरोदर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण बालिका वधू फेम अभिनेत्रीने अद्याप याची पुष्टी केलेली नाही.
अविका गौरचा पती मिलिंद चांदवानी म्हणाला, “हा असा बदल आहे ज्याची आम्ही कधीही कल्पना केली नव्हती किंवा त्याबद्दल कोणताही प्लॅन केला नव्हता. खरं तर, आम्ही त्याबद्दल स्वप्नातही विचार केला नव्हता. हा एक मोठा आणि अद्भुत बदल आहे.”
मिलिंद उत्साहित आहे
अविकाने पतीला विचारलं की तो घाबरला आहे का? ज्यावर मिलिंद म्हणाला की तो थोडा घाबरला आहे, पण खूपच उत्साहित आहे. “आयुष्यात थोडं घाबरणं महत्वाचं आहे,” असं मिलिंदने म्हटलंय.
अविका व मिलिंदच्या आयुष्यात काय बदल होणार?
२०२६ मध्ये आयुष्यात होणारा हा बदल काय आहे, याबद्दल दोघांपैकी कोणीही काहीच माहिती दिलेली नाही. पण चाहते अविकाच्या गरोदरपणाबद्दल अंदाज बांधू लागले आहेत. अविकाने लवकरच या बदलाबद्दल तिच्या चाहत्यांना सांगणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.
अविका गौर व मिलिंद चांदवानी यांचं लग्न खूप चर्चेत राहिलं होतं. कारण त्यांनी ‘पती, पत्नी और पंगा’ या शोच्या सेटवर लग्न केलं होतं. आधी मालिकांमध्ये अनेकदा लग्न करणाऱ्या अविकाचं खरं लग्नही टीव्हीवर झालं. अविका व मिलिंद यांच्या लग्नाच्या एपिसोडला चांगला टीआरपी मिळाला होता.
कोण आहे अविका गौरचा पती?
मिलिंद ‘रोडीज: रिअल हीरोज’ या रिअॅलिटी शोमध्ये झळकला होता. नंतर तो अविकाबरोबर ‘पति पत्नी और पंगा’ या शोमध्ये सहभागी झाला होता. मिलिंद चांदवानीने बंगळुरूमधील दयानंद सागर कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतली. नंतर त्याने आयआयएम-अहमदाबादमधून एमबीए केलं आणि तो इन्फोसिसमध्ये काम करू लागला. तो कॅम्प डायरीज या एनजीओचा संस्थापक आहे.
