Avinash Narkar Buys New Car : मराठी मालिका, सिनेमा, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवारे लोकप्रिय अभिनेते म्हणून अविनाश नारकर यांना ओळखलं जातं. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अविनाश यांच्याप्रमाणे त्यांच्या पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सुद्धा घराघरांत लोकप्रिय आहेत. या जोडप्याचे सोशल मीडिया रील्स व्हिडीओ सर्वत्र तुफान व्हायरल होत असतात.

अविनाश नारकरांसाठी यंदाचा वाढदिवस खूपच खास ठरला आहे. कारण, वाढदिवसानिमित्त त्यांनी नवीन गाडी खरेदी केली आहे. अभिनेते आपल्या कुटुंबीयांसह नव्या गाडी घेण्यासाठी शोरूममध्ये पोहोचले होते. यावेळी या नारकर जोडप्याने एकत्र नव्या गाडीची पूजा केली. या दोघांनी एकत्र केक कापून या नव्या गाडीच्या आगमनाचा आनंद सेलिब्रेट केला.

याशिवाय अविनाश नारकरांनी घरी सुद्धा त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. यावेळी ऐश्वर्या यांनी त्याचं औक्षण केलं आणि त्यानंतर केक कटिंगचा कार्यक्रम पार पडला. अभिनेत्रीने ‘८ जुलै २०२६’ असं कॅप्शन देत खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच “लक्षात राहण्यासारखा दिवस” असंही त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

अविनाश नारकरांनी ‘मारुती सुझुकी Grand Vitara’ ही गाडी खरेदी केली आहे. फायनान्शियल एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, या गाडीची किंमत १०.७६ लाख ते २०.६८ लाखांच्या (एक्स-शोरूम) घरात आहे. ( व्हेरियंटनुसार गाडीच्या किंमतीत बदल होऊ शकतो )

नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तितीक्षा तावडे, विजय आंदळकर, वर्षा दांदळे, खुशबू तावडे, सुकन्या मोने, अश्विनी कासार, सुरुची अडारकर, आशुतोष गोखले या कलाकारांनी कमेंट्स करत अविनाश नारकरांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, अविनाश नारकरांबद्दल सांगायचं झालं तर, सध्या ते टेलिव्हिजनवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ आणि ‘तारिणी’ या दोन लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. याशिवाय ऐश्वर्या-अविनाश हे दोघं एकत्र ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकात सुद्धा काम करत आहेत. एकाचवेळी दोन मालिकांमध्ये काम करणं, याशिवाय रंगभूमीला वेळ देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ऐश्वर्या नारकरांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर त्यांची प्रमुख भूमिका असलेली ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ ही मालिका येत्या २० जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.