Avinash Narkar Birthday Buys New Car : ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्याकडे मराठी मनोरंजनविश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. या दोघांनी आजवर अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये एकत्र काम केलेलं आहे. नारकर जोडप्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचे रील्स व्हिडीओ देखील सर्वत्र तुफान व्हायरल होत असतात. आज अविनाश नारकरांच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या यांनी खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तसेच मराठी मनोरंजन विश्वातून सुद्धा त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

अविनाश नारकरांनी वाढदिवसानिमित्त नवीन गाडी खरेदी केली आहे. याचा पहिला फोटो ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. मोठ्या उत्साहात या जोडप्याने त्यांच्या नव्या गाडीचं स्वागत केल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.

अविनाश नारकरांनी Grand Vitara ही गाडी खरेदी केली आहे. ऐश्वर्या हा फोटो शेअर करत लिहितात, “अभिनंदन अविनाश…Babe Is In Family” या कॅप्शनच्या पुढे त्यांनी ‘Evil Eye इमोजी’ देखील दिला आहे. अभिनेत्यांनी नवीन गाडी खरेदी केल्यावर संपूर्ण कलाविश्वातून त्यांच्यावर अभिनंदाचा वर्षाव करण्यात येत आहे.

अविनाश नारकरांबद्दल सांगायचं झालं तर, सध्या ते टेलिव्हिजनवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ आणि ‘तारिणी’ या दोन लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. याशिवाय ऐश्वर्या-अविनाश हे दोघं एकत्र ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकात सुद्धा काम करत आहेत. एकाचवेळी दोन मालिकांमध्ये काम करणं, याशिवाय रंगभूमीला वेळ देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे सगळेच नवोदित कलाकार त्यांच्याकडे Inspiration म्हणून पाहतात.

avinash narkar new car
अविनाश नारकरांनी खरेदी केली नवीन गाडी ( Avinash Narkar New Car Photo )

याशिवाय ऐश्वर्या नारकरांची प्रमुख भूमिका असलेली ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ ही मालिका येत्या २० जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सायंकाळी ६:३० वाजता ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केली जाईल.