Avinash Narkar Diwali Faral 2024 : सध्या सर्वत्र दिवाळीची लगभग सुरू आहे. संपूर्ण देशभरात हा सण मोठ्या आनंदाने व जल्लोषात साजरा केला जातो. फटाके, रोषणाई, घराघरांत बनवला जाणारा फराळ, फुलांची आरास या सगळ्या गोष्टींमुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये आजूबाजूचं वातावरण प्रसन्न करून टाकणारं होतं. सामान्य लोकांप्रमाणे सेलिब्रिटी सुद्धा शूटिंगमधून ब्रेक घेत मोठ्या आनंदाने आपल्या कुटुंबीयांबरोबर दिवाळीचा सण साजरा करतात. अनेकांनी फराळ बनवायला सुरुवात देखील केली आहे.

ऐश्वर्या नारकर सध्या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. यामुळे त्यांच्या नवऱ्याने ( Avinash Narkar ) यंदा फराळ बनवण्यात पुढाकार घेतला आहे. अविनाश नारकरांनी करंज्या बनवतानाचा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अभिनेते स्वत:च्या हाताने सुबक अशा करंज्या बनवून त्यानंतर तळत असल्याचं पाहायला मिळालं.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
madhuri dixit mumbai home inside photos
माधुरी दीक्षितचं मुंबईतील घर आतून कसं दिसतं? पाहा ५३ व्या मजल्यावरील अपार्टमेंटचा Inside Video
Priya bapat sings kajra mohabbat wala 56 years old song
प्रिया बापटने गायलं ५६ वर्षांपूर्वीचं सुपरहिट बॉलीवूड गाणं! सुमधूर आवाजाचं सर्वत्र होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, “अप्रतिम…”
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
shivani rangoli birthday mother in law mrinal Kulkarni writes special post
लाडक्या सुनेचा वाढदिवस! मृणाल कुलकर्णींची शिवानी रांगोळेसाठी खास पोस्ट; म्हणाल्या, “काहीतरी गंमत…”
marathi actors visited prarthana behere new home in alibaug
प्रार्थना बेहेरे इथेच राहतात का? अभिनेत्रीच्या अलिबागच्या नव्या घरात पोहोचले पूजा सावंतसह सगळे मित्रमंडळी, व्हिडीओ आला समोर

हेही वाचा : मराठी अभिनेत्याने ३० व्या वाढदिवशी घेतली नवीन गाडी! नव्या कारचं नाव ठेवलंय खूपच खास, फोटो शेअर करत म्हणाला…

अविनाश नारकरांनी बनवल्या सुबक करंज्या

“चला चला या या या… सगळ्यांनी फराळाला या !!मी, ऐश्वर्या आणि आमच्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला या मंगलमय, तेजोमय दिवाळी सणाच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप खूप मनापासून शुभेच्छा.!!” असं कॅप्शन देत अविनाश नारकरांनी करंज्या बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

अविनाश नारकरांचं ( Avinash Narkar ) पाककौशल्य पाहून नेटकरी व त्यांचे चाहते भारावून गेले आहेत. ऐश्वर्या नारकरांनी पतीला फराळ बनवताना पाहून “कमाल करंज्या” अशी कमेंट केली आहे. तर, अन्य युजर्सनी “आम्ही कधी यायचं फराळ करायला?”, “अरे वाह दादा”, “मास्टर शेफ सर”, “तुम्ही नेहमीच काहीतरी वेगळं करत असता मस्तच” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा : मिस्टर अँड मिसेस देशमुख पोहोचले इंडोनेशियात! जिनिलीयाने दाखवली बालीमधल्या निसर्गरम्य वातावरणाची झलक, पाहा फोटो…

हेही वाचा : “लग्न झाल्यावर वनवास भोगायला…”, पुरस्कार जिंकल्यावर प्रसादच्या खऱ्या आयुष्यातील ‘पारू’ची खास पोस्ट! अमृता म्हणाली…

दरम्यान, अविनाश नारकर ( Avinash Narkar ) यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, आजवर त्यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मराठी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकतेच ते ‘डंका हरिनामाचा’ या चित्रपटात झळकले होते. याशिवाय अविनाश नारकर सोशल मीडियावर विविध रील्स शेअर करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात.

Story img Loader