scorecardresearch

“माझी बायको होशील तर तुला…” निर्मात्याने प्रसिद्ध अभिनेत्रीला दिलेली ऑफर

एका अभिनेत्रीने रोल मिळवण्यासाठी तिला देण्यात आलेल्या एका ऑफरचा खुलासा केला आहे.

ayesha kapoor
(फोटो – इन्स्टाग्राम)

टीव्ही आणि चित्रपट उद्योगात गॉडफादर नसेल तर काम मिळणं खूप कठीण असतं. अनेक कलाकारांना काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. तर, काहींना कास्टिंग काऊचचा सामनाही करावा लागतो. टीव्हीवरील एका अभिनेत्रीने काम मिळवण्यासाठी तिला देण्यात आलेल्या एका ऑफरचा खुलासा केला आहे.

मुंबईत घर, गाड्या अन्…; कियारा अडवाणीपेक्षा तिप्पट श्रीमंत आहे सिद्धार्थ मल्होत्रा, जाणून घ्या दोघांच्या संपत्तीबद्दल

‘शेरदिल शेरगिल’ या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या आयशा कपूरने तिचा धक्कादायक अनुभव सांगितला. आयशा कपूर आता अनेक वेब सीरिज आणि टीव्ही शोचा भाग आहे, पण जेव्हा तिने काम करायला सुरुवात केली होती, तेव्हा तिला खूप संघर्ष करावा लागला होता. “मला नेहमीच अभिनेत्री व्हायचं होतं, पण माझा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीला मी लोकांना भेटायचे तेव्हा ते मला चुकीचे मार्गदर्शन करायचे. कोणीही स्वत:ला कास्टिंग डायरेक्टर म्हणवून घ्यायचे आणि मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचे. मी मोठ्या हिमतीने खोट्या लोकांपासून सुटका करून घेतली होती,” असं आयशाने सांगितलं होतं.

आयशाने एकदा मीडियाशी बोलताना सांगितलं होतं की, “एकदा मला एका मोठ्या प्रोजेक्टची ऑफर आली होती, मला त्यात मुख्य अभिनेत्री म्हणून कास्ट करण्यात आले होते, पण शोच्या निर्मात्याने माझ्यासमोर एक अट ठेवली होती. जर मी त्याच्याशी लग्न केले तरच मला ही मुख्य भूमिका मिळेल, असे तो म्हणाला. इतकंच नाही तर माझ्याशी लग्न केलंस तर तुला मी मुंबईत लक्झरी लाइफ आणि सर्व सुखसोई पुरवेन,असंही त्याने सांगितलं होतं. कष्टाशिवाय प्रसिद्धी आणि पैसा मिळेल, फक्त बदल्यात त्याच्याशी लग्न करावे लागेल, असं तो म्हणाला होता. मी त्याला नाही म्हटलं होतं”.

“जेव्हा मी त्याची ऑफर नाकारली, तेव्हा मला शोमधून बाहेर काढून टाकण्यात आलं. इतकंच नाही तर मी जेवढे दिवस काम केले तेवढे पैसेही दिले नव्हते,” असं आयशाने सांगितलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 13:40 IST