scorecardresearch

शिव ठाकरेला आमदार बच्चू कडूंचा पाठिंबा; ‘बिग बॉस’ स्टारचा पान टपरीवरील ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले…

Bigg Boss 16: शिव ठाकरेसाठी बच्चू कडूंनी केली खास पोस्ट

bacchu kadu support shiv thakare
शिव ठाकरेसाठी बच्चू कडूंची पोस्ट. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘बिग बॉस हिंदी’चं सोळावं पर्व अंतिम टप्प्यात आलं आहे. यंदाच्या पर्वात मराठमोळा अभिनेता शिव ठाकरेही सहभागी झाला आहे. शिवने त्याच्या दिलखुलास स्वभावाने घरातील सदस्यांसह प्रेक्षकांचीही मनं जिंकून घेतली आहेत. ‘बिग बॉस हिंदी’च्या घरातील सर्वाधिक चर्चेतील चेहऱ्यांपैकी शिव एक आहे.

मराठमोळ्या शिव ठाकरेने ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाच्या ट्रॉफीवर नाव कोरावं, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. शिव ठाकरेच्या समर्थनार्थ अमरावतीत रॅली काढण्यात आली होती. आता आमदार बच्चू कडूंनीही शिवला पाठिंबा दर्शविला आहे. बच्चू कडूंनी त्यांच्या फेसबुकवरुन शिवसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. शिवचा त्याच्या पान टपरीवरील फोटो बच्चू कडूंनी शेअर केला आहे. “अतिशय सामान्य कुटूंबातून अमरावती येथील शिव ठाकरे, बिग बॉस हिंदीच्या फायनलपर्यंत पोहोचला आहे”, असं म्हणत शिवला वोट करण्याचं आवाहन पोस्टमधून बच्चू कडू यांनी केलं आहे.

हेही वाचा>> Video: हटके ड्रेस परिधान केल्यामुळे मलायका अरोरा ट्रोल, नेटकरी म्हणाले “उर्फी जावेद…”

bacchu kadu post for shiv thakare

हेही वाचा>> शाहरुख खानच्या दिग्दर्शकाने दिली गूड न्यूज, घरी चिमुकल्याचं आगमन

बच्चू कडूंनी शिव ठाकरेसाठी केलेली ही पोस्ट व्हायरल होत आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत शिवचं कौतुक केलं आहे. याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही शिवला पाठिंबा दिला होता.

हेही वाचा>> शाहरुख खानच्या ‘पठाण’ची किली पॉललाही भूरळ; गायलं ‘बेशरम रंग’ गाणं, व्हिडीओ व्हायरल

शिव ठाकरे याआधी ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाला होता. या पर्वाचा तो विजेताही ठरला होता. ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाचा अंतिम सोहळा १२ फेब्रुवारीला पार पडणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 14:17 IST