‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री नेहा मर्दा आई झाली आहे. लग्नाच्या ११ वर्षांनंतर नेहाने ८ एप्रिलला गोंडस मुलीला जन्म दिला. गर्भावस्थेतील काही गुंतागुंतींमुळे नेहाने प्री-मॅच्युअर मुलीला जन्म दिला होता. नुकताच नेहाने एका मुलाखतीत आपल्या गरोदरपणातील परिस्थितीबाबत मोठा खुलासा केला आहे.




नेहा मर्दाने तिच्या ब्लॉगमध्ये आपल्या गरोदरपणासंदर्भात अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. नेहा म्हणाली की तिला अनेकदा विचारले जाते की तिने सी-सेक्शन डिलिव्हरी निवडली होती की नॉर्मल. याबाबत नेहाने चाहत्यांसाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याबरोबर नेहाने तिच्या प्रसूतीमधील गुंतागुंतीबाबतही खुलासा केला आहे.
नेहा मर्दाने सांगितले, “एप्रिल २०२३ मध्ये प्रसूतीपूर्वी माझी तब्येत बिघडली. त्यानंतर मला घाईघाईने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी माझ्या बीपीमध्ये अचानक चढ-उतार झाला. सुरुवातीला आम्ही फक्त नॉर्मल डिलिव्हरीचा पर्याय निवडला होता. पण, माझ्या बीपीमुळे, आम्हाला नंतर सी-सेक्शन प्रसूतीची निवड करावी लागली.”
हेही वाचा-
पुढे नेहा म्हणाली, “प्रसूतीच्या वेळी बीपीच्या समस्येमुळे डॉक्टर खूप अस्वस्थ होते. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी माझ्या कुटुंबीयांशी माझ्या गुंतागुंतीबाबत चर्चा केली होती. त्यांनी माझ्या कुटुंबीयांना विचारले, आई किंवा मूल? दोघांपैकी कोणाला वाचवायचे. माझ्या कुटुंबासाठी या प्रश्नाचे उत्तर देणे खूप कठीण होते.” नेहा पुढे म्हणाली की, लोक अनेकदा टोमणे मारतात की त्यांनी नॉर्मलऐवजी सी-सेक्शन निवडले आहे, जेणेकरून मला आराम मिळेल, पण तसे नाही, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की मूल कोणतेही असो, ते निरोगी असणे आवश्यक आहे, असेही नेहा म्हणाली.
नेहाने ‘देवों के देव महादेव’, ‘डोली अरमानों की’, ‘पिया अलबेला’,’ लाल इश्क’ ‘क्यूं रिश्तों में कट्टी-बट्टी’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. २०१२मध्ये नेहा व आयुष्मान अग्रवालशी लग्नगाठ बांधली. आता ते आईबाबा झाले आहेत.