‘बालिका वधू’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अविका गोर सध्या चर्चेत आहे. या मालिकेत अविकाने आनंदीची भूमिका साकारली होती आणि ती प्रचंड गाजली होती. अगदी कमी वेळातच या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं.

बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवणाऱ्या अविकाचा फिल्मी प्रवास आजतागायत सुरू आहे. अविकाने हिंदीसह अनेक तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलंय. या ग्लॅमरस प्रवासात अविकाने तिच्याबरोबर घडलेला एक धक्कादायक प्रसंग एका मुलाखतीतून प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे.

हॉटरफ्लाय (hauterrfly) ला दिलेल्या मुलाखतीत अविकाने या प्रसंगाचा उल्लेख केला आहे. अभिनेत्री म्हणाली की, “मला आठवतंय, जेव्हा मी स्टेजजवळ जात होते तेव्हा पाठून कोणीतरी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा प्रयत्न करत होता आणि त्याच मिनिटाला मी मागे वळून पाहिलं तेव्हा मला दुसरं तिसरं कोणीच दिसलं नाही तर फक्त बॉडीगार्ड दिसला आणि असाच स्पर्श जेव्हा दुसऱ्यांदा होणार होता, तेव्हा मी सावध होते. तो स्पर्श करणार इतक्यात मी त्याचा हात पकडला आणि तेव्हाही तो तोच बॉडीगार्ड निघाला. हा प्रसंग घडताच मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा त्याने माझी माफी मागितली. मग ते प्रकरण मी तिथेच सोडून दिलं.

हेही वाचा… ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या लेकाने ‘असं’ दिलं बाबाला सरप्राईज, अभिनेता फोटो शेअर करत म्हणाला…

अविका पुढे म्हणाली की, “त्यांना कळतच नाही की, समोरच्यावर याचा काय परिणाम होईल. आता तर इथे मी माझी गोष्ट सांगतेय जिथे माझ्या आजूबाजूला बॉडीगार्ड असतात आणि आम्हाला एवढं संरक्षण असतं. पण बघायला गेलं तर अशा खूप साऱ्या मुली आहेत, ज्या बॉडीगार्ड्स घेऊन फिरत नाहीत, हे खूप लज्जास्पद आहे.”

अविकाचा तो धक्कादायक प्रसंग ऐकल्यानंतर मुलाखतदाराने अभिनेत्रीला सांगितलं की, “लारा दत्ताजी जेव्हा आम्हाला भेटल्या होत्या, तेव्हा त्यांनी अशाच एका किश्श्याबद्दल आम्हाला सांगितलेलं, जिथे त्यांनी त्या माणसाच्या कानशिलात लगावली होती.”

हेही वाचा… “फ्लावर नही फायर है…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम शिवानी आणि ऋषिकेशचा ‘पुष्पा-२’च्या गाण्यावर हटके डान्स, चाहते म्हणाले…

यावर प्रतिक्रिया देत अविका म्हणाली की, “तुम्हाला माहीत आहे की यासाठीदेखील खूप हिंमत असायला हवी. माझ्यात जर ती हिंमत असती की मी त्या माणसाला मारू शकेन, तर आतापर्यंत मी खूप साऱ्या लोकांना मारलं असतं. आता मला असं वाटतं की ते मी करू शकेन, पण अशी संधी परत कधीच येऊ नये हीच माझी इच्छा आहे.

दरम्यान, अविका गोरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अविकाचा आगामी चित्रपट ‘ब्लडी इश्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.