गेल्या साडे पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेली मालिका म्हणजे ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’. २०१८ साली ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर बाळूमामांच्या जीवनावर आधारित असलेली ही मालिका सुरू झाली होती. अल्पावधीत ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेचा चाहत्या वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अजूनही मालिका प्रेक्षक आवडीने पाहत आहेत. पण आता ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेचा नवा अध्याय सुरू होणार आहे. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत गेले साडे पाच वर्षांहून अधिक काळ बाळूमामांच्या भूमिकेत अभिनेता सुमीत पुसावळे पाहायला मिळत होता. पण आता या मालिकेतून त्याची एक्झिट झाली आहे. त्यामुळे आता बाळूमामांच्या रुपात कोण झळकणार? याची उत्सुक सगळ्यांना होती. अखेर मालिकेच्या नव्या प्रोमोमधून बाळूमामांची भूमिकेत कोण दिसणार? हे समोर आलं आहे.

हेही वाचा – Video: अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगमध्ये रणबीर कपूर-आलिया भट्टचा आकाश अंबानी-श्लोका मेहतासह भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

‘कलर्स मराठी’च्या अधिकृत सोशल मीडियावर काही तासांपूर्वी ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. “सुरू होणार नवा अध्याय…”, असं कॅप्शन देत ‘कलर्स मराठी’ने मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये बाळूमामांच्या रुपात अभिनेते प्रकाश धोत्रे पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – Video: गोंडस राहा कपूर जेव्हा अनंत अंबानींना भेटते, प्री-वेडिंग सोहळ्यातील आलियाचा लेकीसह व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, प्रकाश धोत्रे यापूर्वी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत पाहायला मिळाले होते. या मालिकेत त्यांनी लतिकाच्या सासऱ्यांची भूमिका म्हणजेच आप्पा जहागीरदार साकारले होते. त्यांनी आजवर १६० अधिक चित्रपट, ५५ हून अधिक मालिकेत काम केलं आहे. याशिवाय बऱ्याच नाटकांमध्येही प्रकाश धोत्रे झळकले आहेत.