scorecardresearch

‘बाळूमामा’ फेम अभिनेत्याची लगीनघाई, लग्नापूर्वीच्या विधींचा व्हिडीओ समोर

‘बाळूमामाच्या नावाने चांगभलं’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुमीत पुसावळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

‘बाळूमामा’ फेम अभिनेत्याची लगीनघाई, लग्नापूर्वीच्या विधींचा व्हिडीओ समोर
सुमीत पुसावळे लवकरच अडकणार विवाहबंधनात. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सध्या मनोरंजनविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. एका मागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधानात अडकत आहेत. नुकतंच अक्षया देवधर व हार्दिक जोशीने लग्नगाठ बांधली. त्याच दिवशी अभिनेता आशय कुलकर्णीही विवाहबद्ध झाला. आता आणखी एका टिव्ही अभिनेत्याच्या घरी लगीनघाई सुरू आहे.

कलर्स वाहिनीवरील ‘बाळूमामाच्या नावाने चांगभलं’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुमीत पुसावळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सुमीतच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून याचा व्हिडीओही समोर आला आहे. सेलिब्रिटी कट्टा या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा>> लग्नाच्या दहा वर्षांनंतर राम चरण होणार बाबा, पोस्ट शेअर करत दिली गूड न्यूज

सुमीत त्याची भावी पत्नी मोनिकासह सप्तपदी घेत नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे. गेल्याच महिन्यात त्याचा साखरपुडा पार पडला. फोटो शेअर करत ही बातमी त्याने चाहत्यांना दिली होती.

हेही वाचा>> भरत जाधव यांच्यासाठी गौरव मोरेची खास पोस्ट, लंडनमधील ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाला…

सुमीतने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. लागिर झालं जी, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकांमध्येही तो झळकला होता. बाळूमामाच्या नावाने चांगभलं या मालिकेने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत सुमीत प्रमुख नायकाची भूमिका साकारत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-12-2022 at 15:41 IST

संबंधित बातम्या