Aasiya Kazi Married to Gulshan Nain: ‘बंदिनी’ फेम लोकप्रिय अभिनेत्री आसिया काझी विवाहबंधनात अडकली आहे. आसियाने तिचा बॉयफ्रेंड अभिनेता गुलशन नैनशी आंतरधर्मीय लग्न केलं. या जोडप्याचे लग्नातील सुंदर फोटो समोर आले आहेत. या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आसिया व गुलशन आठ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते, अखेर दोघांनी आयुष्यातील नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. आसिया-गुलशन यांनी आज खासगी सोहळ्यात लग्नगाठ बांधली. आसियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये काही पोस्ट रिपोस्ट केल्या आहेत, ज्यात तिच्या लग्नातील काही खास क्षण पाहायला मिळतात.
हेही वाचा – साता जन्माचे सोबती! रेश्मा शिंदे दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; फोटो शेअर करत म्हणाली, “आयुष्याची…”
आसिया व गुलशन यांची पहिली भेट सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये झाली होती. तिथेच दोघांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. हे दोघेही आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आसिया व गुलशन यांच्या नात्याला त्यांच्या कुटुंबियांचा विरोध होता. दोघांचे धर्म वेगळे असल्याने त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं नातं मान्य नव्हतं. त्यांच्या कुटुंबियांनी खूप विरोध केला, मात्र गुलशन व आसियाने एकमेकांची साथ सोडली नाही. आता दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाला कुटुंबीय, काही नातेवाईक व जवळचे मित्र उपस्थित होते.
हेही वाचा – तीन वर्षांचा संसार अन् २ वर्षांची लेक, प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाचे फोटो शेअर करून घटस्फोटाची केली घोषणा
आसिया काझी करिअर
आसिया काझी ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. ‘बंदिनी’ या मालिकेत तिने मुख्य भूमिका केली होती. रोनित रॉय, मृणाल जैन, शार्दूल पंडित, रसिका, जोशीसारखे कलाकार या मालिकेत होते. तसेच आसियाने इतरही अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘माटी की बन्नो’, ‘हिटलर दीदी’, ‘बालिका वधू’, ‘ये है आशिकी’ या तिच्या मालिका आहेत. गुलशनने ‘शौर्य और अनोखी की कहानी’ मध्ये काम केलं आहे.