BBM4 vikas sawant rohit shinde fight bigg boss punished both of them jail video | Loksatta

Video: आधी धक्का दिला, मग जोरात ढकललं; विकास सावंत व रोहित शिंदेमध्ये हाणामारी; बिग बॉसने सुनावली जेलमध्ये राहण्याची शिक्षा

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस’च्या घरात रोहित शिंदे व विकास सावंत यांच्यात तुफान राडा झाला.

bigg boss marathi fight between rohit shinde and vikas sawant
बिग बॉसच्या घरात रोहित शिंदे व विकास सावंत यांच्यात तुफान राडा झाला. (फोटो: कलर्स मराठी/ इन्स्टाग्राम)

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व दिवसेंदिवस रंजक होत चाललं आहे. ५० दिवस उलटल्यानंतर खेळात टिकून राहण्यासाठी आता स्पर्धक टास्कदरम्यान अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अमृता धोंगडेने टास्कदरम्यान घरातील जेल तोडल्यामुळे बिग बॉसने दंड म्हणून तिची दोन आठवडे कॅप्टन्सी पदाची उमेदवारी काढून घेतली. आता बिग बॉसने विकास सावंत व रोहित शिंदेला गैरवर्तनासाठी शिक्षा सुनावली आहे.

किरण मानेंना विशेष पॉवर दिल्यामुळे त्यांनी ठरविलेल्या टॉप ५ सदस्यांमध्ये कॅप्टन्सी टास्क खेळवला गेला. अपुर्वा नेमळेकर, रोहित शिंदे, विकास सावंत, समृद्धी जाधव व तेजस्विनी लोणारी या स्पर्धकांमध्ये कॅप्टन्सीसाठी स्पर्धा सुरू आहे. या टास्कदरम्यान रोहित शिंदे व विकास सावंतमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा>> ‘गलवान’चा उल्लेख करत रिचा चड्ढाने केलं ट्वीट, नेटकऱ्यांची fukrey3 बॉयकॉट करण्याची मागणी

हेही वाचा>> “तैमूरला जंक फूड…” सैफ अली खानने लेकाच्या खाण्याच्या सवयींबाबत केला खुलासा

‘कलर्स मराठी’च्या ऑफिशिअल अकाऊंटवरुन रोहित शिंदे व विकास सावंत यांच्यातील हाणामारीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये रोहित व विकास आक्रमक झाल्याचं दिसत आहे. आधी रोहितने विकासला ढकललं. त्यानंतर विकासही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जात असतानाच घरातील इतर सदस्य त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. रोहित व विकासने केलेल्या गैरवर्तनामुळे दोघांनाही बिग बॉसने जेलमध्ये राहण्याची शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा>> आधी हाताने खेचलं, मग थेट दबंग स्टाइलने लाथ मारुन अमृता धोंगडेने तोडलं जेल; ‘बिग बॉस’ने सुनावली कठोर शिक्षा

‘बिग बॉस’चा खेळ अधिकच रंजक होत चालला आहे. आता कॅप्टन्सी टास्कमध्ये कोण बाजी मारुन घरातील नवा कॅप्टन बनणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-11-2022 at 20:13 IST
Next Story
“त्या रात्री घाट उतरत असताना….” मयुरी वाघने सांगितला अद्भुत किस्सा