scorecardresearch

“ते माझा पाठलाग करत, भिंतींवर अश्लील गोष्टी…” सौम्या टंडनने सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रसंग

या घटनांचा सौम्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला

saumya tandon
फोटो : सोशल मिडिया

टेलिव्हिजन अभिनेत्री सौम्या टंडनला ओळखत नाही अशी व्यक्ती सापडणं कठीण आहे. गेले काही दिवस सौम्या अभिनयापासून लांब आहे, तरी तिच्याबद्दल सतत चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असतेच. नुकतंच तिने एका मुलाखतीमध्ये तिच्या लहानपणी घडलेल्या काही भयानक घटनांचा खुलासा केला आहे.

‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सौम्या टंडनने तिच्या बाबतीत घडलेल्या छेडछाडीच्या प्रसंगाबद्दल खुलासा केला आहे. मध्यप्रदेश भोपाळमध्ये जन्मलेल्या सौम्याने तिच्या शालेय वयात आलेल्या काही भयावह अनुभव तिने या मुलाखतीमध्ये शेअर केले आहेत. भोपाळमधून उज्जैनमध्ये कुटुंब राहायला आल्यानंतर तिचं संपूर्ण शालेय शिक्षण तिथेच झालं.

आणखी वाचा : पत्नी कियारा अडवाणीच्या पाया पडला सिद्धार्थ मल्होत्रा; अभिनेत्याच्या कृतीने वेधलं पाहुण्यांचं लक्ष

एका अनुभवाबद्दल सांगताना ती म्हणाली, “एक दिवस मी रात्री घरी परतत होते, तेव्हा एका भरधाव मोटरसायकलवर एक मुलगा आला, त्याने माझ्या पुढ्यात ती मोटर सायकल थांबवली, त्याने माझ्या कपाळावर कुंकू (सिंदूर) लावलं आणि तो तिथून निघून गेला.” या घटनेचा सौम्यावर चांगलाच परिणाम झाला. इतकंच नाही तर सौम्या एकदा सायकलवरून शाळेतून घरी परतत होती तेव्हा एका मुलाने तिला ओव्हरटेक केलं तेव्हा ती सायकलवरून पडली होती.

पडल्यावर तिचा हात मोडला आणि तिथे तिची मदत करायला कुणीच आलं नसल्याचाही सौम्याने खुलासा केला. त्यानंतर उज्जैनमध्ये राहताना सौम्या स्वतःच स्वतःची काळजी घ्यायला शिकली. बऱ्याचदा रस्त्यांवर मुलं तिचा पाठलाग करायचे तर भिंतींवर तिच्याविषयी अश्लील गोष्टी लिहायचे हेदेखील तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं. ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेमुळे सौम्याला लोकप्रियता मिळाली. शाहिद कपूर आणि करीना कपूरच्या ‘जब वी मेट’ चित्रपटातही तिने छोटी भूमिका केली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 15:19 IST
ताज्या बातम्या