‘लाखात एक आमचा दादा'(Lakhat Ek Aamcha Dada) मालिकेतील पात्रांचा दाखवलेला साधेपणा, कुटुंबाला एकत्र जोडून ठेवण्यासाठी सुरू असलेली सूर्याची धडपड, तुळजाची काळजी, तिच्याशी असलेली मैत्री, बहीण भावांचे एकमेकांप्रति असलेले प्रेम यामुळे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. आता या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

तेजूला लग्नासाठी पुन्हा नकार…

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये तेजूला पाहुणे बघायला येणार असल्याचे सूर्या घरातील सर्वांना सांगतो. हे ऐकताच तेजू, राजश्री, धनश्री, भाग्यश्री या सगळ्यांना आनंद होतो. तेजू तयार होते मात्र तिच्या चेहऱ्यावर चिंता असते. तुळजा तिला विचारते काय झालं? तेजू तिला म्हणते, तुला तर माहित आहे ना माझ्याबरोबर काय झाले आहे. त्यानंतर पाहुणे येतात.तेजू सगळ्यांना चहा देते. तितक्यात तिथे उपस्थित असलेली महिला सूर्याच्या मामांना दुसरीकडे बोलवते आणि त्यांना सांगते की तेजूला बघायला मुलाचे आधीच लग्न झाले होते.

Bigg Boss Marathi Ankita Walawalkar Meets Suraj Chavan
अखेर भेट झालीच! होणाऱ्या नवऱ्यासह अंकिता पोहोचली बारामतीला; सूरजच्या गावच्या शेतात बसून मारला ‘या’ पदार्थावर ताव
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
Nitesh Chavan And Isha Sanjay
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील राजश्रीची सूर्यादादासाठी खास पोस्ट; म्हणाली, “यामुळेच मी तुला…”
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
Paaru
“हा बिझनेस तुमचासुद्धा…”, प्रीतम व प्रियाचा तो संवाद ऐकताच पारूने घेतला निर्णय; म्हणाली, “या घरची मोठी सून म्हणून…”
Navri Mile Hitlarla
पाडवा साजरा करण्यासाठी लीलाने केली युक्ती; टायगरला बोलवताच एजेने…; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

सूर्याचे मामा त्याला फोन करून आता बोलवून घेतात आणि त्याला सांगतात की त्या मुलाचे आधी लग्न झाले आहे. तो बाहेर येतो आणि विचारतो तुमचं हे पहिलंच लग्न आहे ना? तो मुलगा म्हणतो, हिचंसुद्धा लग्न साखरपुड्यातच मोडलंय ना? तर हीसुद्धा सेंकड हँडच झाली. आता कोण करेल हिच्याशी लग्न? हे ऐकल्यानंतर सूर्या त्याच्यावर ओरडताना दिसत आहे. आलेले पाहुणे आम्हाला सेंकड हँड मुलगी नकोच आहे, असे म्हणत रागाने निघून जातात. तेजू रडते. हे सगळं पाहिल्यानंतर सूर्याची सगळ्यात लहान बहीण भाग्यश्रीला मात्र वेगळाच प्रश्न सतावताना दिसतो. ती मनातल्या मनात विचार करते की दादाचं आता वहिनीशी लग्न झालं आहे. वहिनी दादाच्या आयुष्यातून निघून गेल्यावर दादासुद्धा सेंकड हँडच होईल.कोण करणार माझ्या दादाशी लग्न?असा विचार करताना ती दिसत आहे.

इन्स्टाग्राम

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो शेअर करताना,झी मराठी वाहिनीने, “लग्नाच्या तिढ्यात, भागूला मात्र दादा अन् तुळजाच्या लग्नाची काळजी..!”, अशी कॅप्शन दिली आहे.

हेही वाचा: अथिया शेट्टी व केएल राहुल होणार आई-बाबा; लग्नानंतर दोन वर्षांनी करणार नव्या सदस्याचं स्वागत

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सूर्याची आई पळून गेल्यामुळे त्याच्या कुटुंबाला लोकांच्या टोमण्यांचा सामना करावा लागतो. यामुळे तेजुचे पहिल्यांदा ठरलेले लग्न साखरपुड्यात मोडले. तुळजा आणि सूर्यानेदेखील त्यांचे लग्न त्याच्या सगळ्या बहि‍णींची लग्न होईपर्यंत टिकवायचे असे ठरवले होते. आता मात्र तुळजा हळूहळू सूर्याच्या प्रेमात पडत असल्याचे दिसत आहे.

आता तुळजा तिच्या भावना सूर्याला सांगणार का, तेजूची समजूत सूर्या आणि तुळजा काढू शकणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader