‘सावळ्याची जणू सावली’ (Savlyachi Janu Savli) या मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसतात. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली असते. आता या मालिकेत लग्नाचा ट्रॅक पाहायला मिळत आहे. सावलीच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता मात्र ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

भैरवीचे सावलीच्या वडिलांना चॅलेंज

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला सावलीच्या हळदीचा कार्यक्रम सुरू आहे. सावलीचे आई-वडील तिला हळद लावत आहेत. हळद लावताना तिची आई भावूकदेखील झाली आहे. तितक्यात भैरवी येते आणि म्हणते, “थांबवा रे वाजंत्री, उद्या गाण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. तुला माझ्याबरोबर यायचं आहे. उद्या गाण्याचे किती पैसे घेशील?” भैरवीचे हे बोलणे ऐकल्यानंतर सावलीचे वडील म्हणतात, “मी माझ्या साऊला मी कुठंबी पाठवणार नाही. मग पन्नास द्या किंवा पाच लाख”, सावलीच्या वडिलांनी असे म्हटल्यावर भैरवी त्यांच्यावर ओरडते आणि म्हणते, “मीही बघतेच कशी येत नाही ते”, असे बोलून भैरवी निघून जाते.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Couples unique dance
”हृदयी वसंत फुलताना..” गाण्यावर काका काकूंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो
झी मराठी इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “लग्न की कर्तव्य, काय असेल सावलीचा निर्णय?”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे सावलीच्या कुटुंबाची परिस्थिती ही अत्यंत गरीब आहे. तिच्या घरात आई, वडील, मोठा भाऊ, त्याची पत्नी आणि तिचा लहान भाऊ अप्पू आहे. अप्पूच्या आजारपणासाठी त्यांना पैशांची गरज आहे. याचाच फायदा भैरवी घेते. भैरवी ही नावाजलेली गायिका आहे, मात्र तिची मुलगी ताराचा आवाज चांगला नाही, त्यामुळे स्वत:ची प्रतिष्ठा जपण्यासाठी भैरवी सावलीला तारासाठी गायला सांगते. लोकांसमोर तारा गात असते, मात्र स्टेजच्या पाठीमागे सावली गाते. हा आवाज अनेकांना आवडतो. अनेक कार्यक्रम होतात, त्यात तारा स्टेजवर तर सावली स्टेजमागून गात असते. या गाण्याचे आणि स्वत:चा खरा आवाज लोकांसमोर न येण्याचे सावलीला पैसे मिळतात.

हेही वाचा: पाच तास गप्पा, पॅनकेक अन् २ किलो बटर…; अरेंज मॅरेज पद्धतीने जमलेलं प्रार्थना बेहेरेचं लग्न; पहिल्या भेटीत नेमकं काय घडलेलं?

आता सावली काय करणार? तिच्या लग्नापेक्षाही ती गायनासाठी जाणार का? सावली गाणे म्हणण्यासाठी जावी यासाठी भैरवी काय करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader