अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) २९ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकली. केळवणापासून ते हळदीपर्यंत रेश्माचे सर्व कार्यक्रम एकदम दणक्यात पार पडल्याचे पाहायला मिळाले. या सर्व कार्यक्रमांना तिच्या कलाकार मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावल्याचे समोर आलेल्या फोटोमधून दिसले. तिच्या लग्नालादेखील तिची गाजलेली मालिका ‘रंग माझा वेगळा’मधील सहकलाकारांनी, तसेच ‘लगोरी’ मालिकेतील अनघा व अभिज्ञा या अभिनेत्रींनीदेखील हजेरी लावली होती. सध्या रेश्मा ज्या मालिकेत काम करीत आहे, ती मालिका म्हणजे ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेतील कलाकारही तिच्या लग्नाला हजर होते. रेश्माच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या सगळ्यात मात्र तिच्या वाढदिवसानिमित्त तिची सहकलाकार भक्ती देसाई हिने शेअर केलेला व्हिडीओ सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

काय म्हणाली अभिनेत्री?

अभिनेत्री भक्ती देसाईने सोशल मीडियावर रेश्माचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना रेश्माला टॅग करीत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, “सेटवरच्या लग्नात रेश्मा”, असे लिहीत पुढे हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये रेश्मा अंतरपाटाच्या एका बाजूला उभी असलेली दिसत आहे. तिच्या हातात फुलांचा हार आहे. या व्हि़डीओमध्ये ती मजा-मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडीओ घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील लग्नाच्या शूटिंगचा आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Vishnu Bhangale suspended from the Thackeray group, is now Jalgaon district head of Shinde group
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित, विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
Maharashtrachi Hasyajatra Shivali Parab sent mangala movie trailer to Bollywood celebrity on instagram
शिवाली परबने शाहरुख खानपासून ते जॅकी जॅनपर्यंतच्या कलाकारांना पाठवला ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर; सयाजी शिंदेंचं आलं प्रत्युत्तर, म्हणाले…
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”

त्याबरोबरच भक्ती देसाईने तिच्या इन्स्टाग्रामवर रेश्मा शिंदेच्या लग्नाचे फोटोदेखील शेअर केले आहेत. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील कलाकारांचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा: ५० हजार रुपये देऊन खलनायकाची भूमिका करण्यापासून रोखलं; शक्ती कपूर यांनी असं का केलं? बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्याने केला खुलासा

दरम्यान, स्टार प्रवाह वाहिनीवर रेश्मा शिंदे सध्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत तिने जानकी हे पात्र साकारले आहे. साधी, संस्कारी, कुटुंबाला सर्वोच्च स्थान देणारी, कोणत्याही परिस्थितीला धाडसाने सामोरी जाणारी, अशी तिची भूमिका या मालिकेत पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या ही तिची जाऊ तिला त्रास देण्यासाठी सतत काही ना काही करत असल्याचे पाहायला मिळते. तिच्यामुळे जानकीला तिच्या पती व मुलीसह घराबाहेर पडावे लागले आहे. आता ऐश्वर्याचे सत्य सर्वांसमोर कसे व कधी येणार आणि जानकीची खरी बाजू सर्वांना कधी समजणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Story img Loader