‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे महाराष्ट्रभरात लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमामध्ये काम करणारा प्रत्येक अभिनेता अगदी प्रत्येकाला खळखळून हसवतो. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे निखिल बने. निखिल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे नावारुपाला आला. त्याचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. सोशल मीडियावर त्याचे हजारो फॉलोवर्स आहेत. आता निखिलने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ती पोस्ट पाहून त्याचं सगळेच जण कौतुक करत आहेत. निखिल भांडुप येथीला चाळीमध्ये राहतो. त्याने मेहनतीच्या जोरावर आज स्वतःचं एक वेगळं विश्व निर्माण केलं आहे. आई-वडील तसेच एका खास व्यक्तीसह फोटो शेअर करत निखिलने आनंदाची बातमी दिली आहे. त्याला भेटण्यासाठी चक्क भांडुप पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस अधिकारी नितीन उनवणे घरी आले होते. नितीन उनवणे हे निखिलचे तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे चाहते आहेत. आणखी वाचा - प्रेमविवाह, वाद, आर्थिक चणचण अन्…; ४० वर्षांनंतर आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबत स्मृती इराणींचं भाष्य, म्हणाल्या, “त्यांच्यामध्ये…” निखिल बनेची पोस्ट नितीन उनवणे भेटण्यासाठी घरी आल्यानंतर निखिलही खूश झाला. त्याने फोटो काढत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे खास पोस्ट शेअर केली आहे. तो म्हणाला, "आज भांडुप पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस अधिकारी (PI) श्री. नितीन उनवणे यांनी राहत्या घरी भेट दिली. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी आनंदाचा क्षण. आमच्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे खूप मोठे चाहते". आणखी वाचा - २२व्या वर्षी लग्न, पाच मुलं आणि…; लग्नानंतरही राज कपूर यांचं सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर होतं अफेअर, पत्नीला समजलं अन्… या फोटोमध्ये निखिलच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरही भलताच आनंद पाहायला मिळत आहे. निखिलची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. बने आम्हाला तुझा अभिमान आहे, तू आमचा अभिमान आहेस, तू नाव काढलंस, बने तू खूप खूप मोठा हो, आम्ही पण तुझे खूप मोठे चाहते आहोत अशा अनेक कमेंट त्याच्या चाहत्यांनी केल्या आहेत.