Bharti Singh Baby Boy Name: ‘लाफ्टर क्वीन’ भारती सिंग तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. भारती सिंग १९ डिसेंबर २०२५ रोजी दुसऱ्यांदा आई झाली. ४१ वर्षांच्या भारती सिंगने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. आता भारतीने तिच्या मुलाचं नाव जाहीर केलं आहे.
भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांच्या दुसऱ्या मुलाचा नामकरण सोहळा पार पडला. भारती सिंगने या सोहळ्यातील फोटो शेअर करून बाळाचं नाव काय ठेवलं ते सांगितलं आहे. फोटोमध्ये भारतीने तिच्या चिमुकल्या बाळाला जवळ घेतलंय, तर हर्षने मोठा मुलगा लक्ष्य याला कडेवर घेतलं आहे.
फोटोंमध्ये भारतीने लाल रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आहे. तर हर्ष, लक्ष्य व त्याच्या धाकट्या भावाने जांभळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये ट्विनिंग केलं आहे. हे फोटो शेअर करत भारतीने ‘यशवीर’ असं कॅप्शन दिलं आहे. भारती व हर्ष यांनी दुसऱ्या मुलाचं नाव यशवीर ठेवलं आहे.
पाहा पोस्ट
भारती सिंगने ही पोस्ट शेअर केल्यावर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. मलायका अरोराने या पोस्टवर रेड हार्ट व नजरचा इमोजी कमेंट केले आहेत. त्याचबरोबर शरद मल्होत्रानेही कमेंट केली आहे. चाहतेही भारती सिंगच्या या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
भारती सिंग व हर्ष दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते व्लॉग बनवतात. या व्लॉगमध्ये ते त्यांच्या दैनंदिन आयुष्याबद्दल माहिती देत असतात. यशवीरच्या जन्मावेळी भारती सिंगला खूप त्रास झाला होता. तिला काही काळ यशवीरपासून दूर ठेवलं होतं. तेही भारती सिंगने व्लॉगमध्ये सांगितलं होतं.
दरम्यान, भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांनी २०१७ साली लग्न केलं होतं. त्यांना लक्ष्य नावाचा एक मुलगा आहे. लक्ष्यचा जन्म ३ एप्रिल २०२२ रोजी झाला होता. लक्ष्य लवकरच चार वर्षांचा होईल. लक्ष्य आता यशवीरचा मोठा भाऊ झाला आहे.

