Bharti Singh Blessed with Baby Boy: कॉमेडियन व रिअॅलिटी शोची होस्ट ‘लाफ्टर क्वीन’ भारती सिंग दुसऱ्यांदा आई झाली आहे. भारती सिंगच्या घरी आणखी एका चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे. भारतीने आज, १९ डिसेंबर २०२५ रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
भारती सिंग ४१ व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली आहे. लग्नानंतर आठ वर्षांनी भारती सिंग व तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनी दुसऱ्या बाळाचं स्वागत केलं. भारती व हर्ष यांना एक मुलगा होता, त्यानंतर आता दुसऱ्यांदा भारतीला मुलगा झाला आहे. महत्वाचं म्हणजे भारती कालपर्यंत म्हणजेच प्रसूतीच्या आदल्या दिवसापर्यंत ‘लाफ्टर शेफ्स’ या शोचं शूटिंग करत होती. भारतीने लक्ष्यच्या जन्मावेळी आणि आताही गरोदर असतानाही प्रसूतीची वेळ जवळ येईपर्यंत काम केलं.
भारती सिंग रुग्णालयात आहे. भारती व हर्षने अद्याप ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केलेली नाही. पण लाफ्टर शेफ्समधील कलाकारांनी भारतीला मुलगा झाल्याचं पापाराझींना सांगितलं. तसेच सर्वांना मिठाई वाटली. अली गोनीने ‘आम्ही मामा झालो, भारतीला मुलगा झाला,’ असं म्हणत मिठाई वाटली.
पाहा व्हिडीओ-
भारती व हर्ष दुसऱ्यांदा आई-बाबा झाल्याची गोड बातमी ऐकल्यावर चाहते त्यांचं अभिनंदन करत आहेत. दुसरीकडे लाफ्टर शेफ्समधील तेजस्वी प्रकाश, अली गोनी, जन्नत जुबैर, कश्मिरा शाह, करण कुंद्रा, ईशा मालवीय, कृष्णा अभिषेक, गुरमीत चौधरी, विवियन डिसेना या सर्व कलाकारांनी मिठाई वाटप केले.
दरम्यान, भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांनी २०१७ साली लग्न केलं होतं. त्यांना लक्ष्य नावाचा एक मुलगा आहे. लक्ष्यचा जन्म ३ एप्रिल २०२२ रोजी झाला होता. लक्ष्य साडेतीन वर्षांचा झाला आहे. आता भारतीने दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे.
भारती सिंगला मुलगी हवी होती
भारती सिंग व हर्ष यांनी अनेकदा त्यांना मुलगी हवी, अशी भावना व्यक्त केली होती. आपल्या व्लॉगमध्ये ते बरेचदा दुसरी मुलगी हवी असं म्हणायचे. आता भारतीला मुलगा झाला आहे. चिमुकल्या लक्ष्यला धाकटी बहीण नाही, तर धाकटा भाऊ आला आहे.
