Bhau Kadam Daughter : भाऊ कदम व प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांची जोडी प्रेक्षकांना नुकतीच एका म्युझिकल व्हिडीओमध्ये पाहायला मिळाली. या दोघांचाही चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. दादा कोंडके यांच्या ‘आंधळा मारतो डोळा’ या चित्रपटात “हिल हिल पोरी हिला…” हे गाणं होतं. या ५२ वर्षांपूर्वीच्या गाण्याचं एक नवीन व्हर्जन नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आणि लोकप्रिय अभिनेते भाऊ कदम यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकली आहे.
आता “हिल हिल पोरी हिला…” गाण्याच्या याच नव्या व्हर्जनवर भाऊ कदम यांनी आपल्या मुलींसह डान्स केला आहे. भाऊ कदम यांना तीन मुली असून संचिता, समृद्धी आणि मृण्मयी अशी त्यांची नावे आहेत. या सगळ्यांनी मिळून “हिल हिल पोरी हिला…” गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.
विशेष म्हणजेच भाऊ कदम यांची मोठी मुलगी मृण्मयी नुकतीच भारतात परतली आहे. मायदेशी परतल्यावर तिने सगळ्यात आधी आपल्या बाबांच्या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स केला. भाऊ कदम यांची लेक मृण्मयी कदम युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (United States Of America) येथे उच्च शिक्षणासाठी गेली होती, यावेळी तिने शिक्षणाबरोबरच एका नामांकित कॅफेत नोकरी सुद्धा केली. नोकरी करून तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.
मृण्मयीचं शिक्षण आता पूर्ण झालं असून, काही दिवसांपूर्वीच तिच्या महाविद्यालयात ‘ग्रॅज्युएशन डे’ पार पडला. आता पदवीप्रदान समारंभ पार पडल्यावर मृण्मयी भारतात परतली आहे. लाडक्या लेकीला मायदेशी आल्याचं पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
भाऊ कदम आणि त्यांच्या मुलींनी केलेल्या या डान्स व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाडला आहे. गौतमी पाटीलने या व्हिडीओच्या कमेंटमध्ये ‘हार्ट इमोजी’ दिला आहे. तर, अन्य नेटकरी हा डान्स पाहून म्हणतात, “ओह मस्त डान्स”, “मृण्मयी इज बॅक”, “वेलकम बॅक गर्ल मस्त डान्स”, “भाऊ दादा मस्त डान्स” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.
दरम्यान, भाऊ कदम आणि गौतमी पाटील या दोघांनी ‘हिल पोरी हिला’ या म्युझिक व्हिडीओमध्ये अनेक वेगवेगळे लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्या लूकमध्ये गौतमीने लाल रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसलीये. दुसऱ्या काही सीन्समध्ये या दोघांनी कोळी लूक, वेस्टर्न लूक, रेट्रो लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय या दोघांनी म्युझिक व्हिडीओमध्ये जबरदस्त डान्स सुद्धा केला आहे.
