'मी टू' आरोपांमध्ये अडकलेला साजिद खान रस्त्यावर विकायचा टूथपेस्ट, 'बिग बॉस'च्या घरात खासगी आयुष्याबाबत म्हणाला... | big boss 16 director producer sajid khan talk about his personal life says he sold toothpaste on road see details | Loksatta

‘मी टू’ आरोपांमध्ये अडकलेला साजिद खान रस्त्यावर विकायचा टूथपेस्ट, ‘बिग बॉस’च्या घरात खासगी आयुष्याबाबत म्हणाला…

दिग्दर्शक-निर्माता साजिद खानने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबाबत खुलासा केला आहे.

‘मी टू’ आरोपांमध्ये अडकलेला साजिद खान रस्त्यावर विकायचा टूथपेस्ट, ‘बिग बॉस’च्या घरात खासगी आयुष्याबाबत म्हणाला…
दिग्दर्शक-निर्माता साजिद खानने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबाबत खुलासा केला आहे.

दिग्दर्शक-निर्माता साजिद खानने हिंदी ‘बिग बॉस’च्या घरामध्ये एंट्री केली. हिंदी ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वामध्ये तो पुढे काय काय धमाल-मस्ती, राडे करणारा हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच. पण साजिद ‘मी टू’ प्रकरणामुळे बराच चर्चेत आला होता. त्याचं खासगी आयुष्यही नेहमीच चर्चेचा विषय ठरलं. आता ‘बिग बॉस’च्या घरामध्ये त्याने आपल्या खासगी आयुष्याबाबत खुलासा केला आहे. तसेच करिअरच्या सुरुवातीच्या काळाबाबत साजिदने सांगितलं आहे.

‘बिग बॉस १६’च्या आधीच्या भागामध्ये एलिमिनेशनसाठी नॉमिनेश प्रक्रियेला सुरुवात झाली. यामध्ये इतर काही स्पर्धकांबरोबर साजिद खानलाही नॉमिनेट करण्यात आलं. साजिदला स्पर्धक व अभिनेत्री शालिन भनोटने नॉमिनेट केलं. शालिन-साजिदमध्ये सुरुवातीला चांगली मैत्री पाहायला मिळाली. पण जेव्हा तिनेच आपल्याला नॉमिनेट केलं हे समजल्यानंतर साजिदला वाईट वाटलं.

यानंतर साजिद शालिनबरोबर याविषयावर बोलतो. तेव्हा साजिदला या शोची फार गरज नाही. त्याच्या तुलनेमध्ये स्पर्धक मान्या सिंहला शोची जास्त गरज आहे कारण तिचे वडील रिक्षा चालवतात. मान्याला आपल्या वडिलांना मर्सिडिज कार गिफ्ट करायची आहे. असं शालिन म्हणते. शालिनचं हे म्हणण ऐकूनच साजिद आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबाबत भाष्य करतो.

आणखी वाचा – Video : प्राजक्ता माळीच्या घराची सफर, अभिनेत्रीने आपल्या हक्काच्या घराची केली सुंदर सजावट

साजिद म्हणतो, “वयाच्या १४व्या वर्षी मी रस्त्यावर टूथब्रश विकले आहेत. मी इथवर पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.” साजिद ‘बिग बॉस’मध्ये राहू इच्छित नाही असंही शालिन यावेळी बोलली. पण साजिदला जेव्हा ‘बिग बॉस’ने याबाबत विचारलं तेव्हा असं काहीच नसल्याचं त्याने स्पष्टपणे सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“बिग बॉस आदेश देत आहे की…” आवाजामागचे गुपित उलगडले

संबंधित बातम्या

“मी त्याची…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारासाठी श्रेया बुगडेची खास पोस्ट
दिव्या अग्रवालच्या मराठमोळ्या बॉयफ्रेंडने दिलेल्या अंगठीने वेधलं सर्वांचेच लक्ष, अंगठीवर लिहिलंय…
‘फू बाई फू’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, अवघ्या महिन्याभरात कार्यक्रम संपण्याचं कारण आलं समोर
“माझ्या लग्नात…” हार्दिक जोशीसह विवाहबंधनात अडकल्यानंतर अक्षया देवधरने शेअर केली खास पोस्ट
“ओंकारने आधीच सांगितलं असतं तर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक स्पष्टच बोलले

व्हिडिओ

ताज्या बातम्या
नोटाबंदीबाबत मूकदर्शक बनणार नाही!; सर्वोच्च न्यायालयाने रिझव्‍‌र्ह बँकेला सुनावले
गोवर लसीकरण मोहीम दोन टप्प्यांत
Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक एसटी सेवा तूर्तास बंद; ६६० बस फेऱ्यांवर परिणाम
मुंबईतील हवा ‘अत्यंत वाईट’; धुरक्याच्या प्रमाणात वाढ
चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम नव्या शैक्षणिक वर्षांपासून; उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे निर्देश