Premium

“बाकीच्या मंडळांचे देव पण पावतात”, लालबागच्या राजाच्या दर्शनावरून ट्रोल करणाऱ्याला अभिनेत्रीने दिलं उत्तर, म्हणाली…

“”मी नवस करत नाही”, ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने ट्रोलरच्या ‘त्या’ कमेंटला दिलं उत्तर, म्हणाली…

big boss fame actress ruchira jadhav reply to trolls
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने ट्रोलरला दिलं उत्तर

‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वामुळे अभिनेत्री रुचिरा जाधव प्रसिद्धीझोतात आली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी व्हिडीओ, फोटो किंवा आपली मतं ट्विटर, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. पण काही वेळेला यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नुकतंच अभिनेत्री रुचिरा जाधवने एका ट्रोलरला स्पष्ट उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “भांडी घासणं, पंखा पुसणं अन्…”, विकी कौशल घरात करतो ‘ही’ कामं, खुलासा करत म्हणाला…

गणेशोत्सवानिमित्त सध्या अनेक कलाकार विविध गणपती मंडळांना भेट देत बाप्पाचा आशीर्वाद घेत आहेत. अलीकडेच रुचिरा सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गेली होती. याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. परंतु, या फोटोखाली कमेंट करत नेटकऱ्यांनी रुचिराला ट्रोल केलं.

हेही वाचा : Video : गणपती विसर्जन सोहळ्यात जान्हवी कपूरचा कथित बॉयफ्रेंडसह भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

रुचिराने शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी, “यांना बरोबर लगेच पुढे घेतात”, “सेलिब्रिटी असल्याचा हाच फायदा असतो” अशा बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत. यातील एका युजरला अभिनेत्रीने उत्तर देत स्वत:ची बाजू मांडली आहे.

एका नेटकऱ्याने अभिनेत्रीच्या फोटोंवर “बाकीच्या मंडळांचे देव पण पावतात बरं का नवसाला” अशी कमेंट केली होती. यावर उत्तर देत रुचिरा म्हणाली, “मी नवस करत नाही. मी बाप्पाला भेटायला जाते आणि मुळात नेहमी काहीतरी मागण्यापेक्षा जे दिलंय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आवडतं मला”

हेही वाचा : ‘शुभविवाह’ फेम मधुरा देशपांडेने सांगितला नवऱ्याबरोबरच्या पहिल्या डेटचा भन्नाट किस्सा; म्हणाली….

रुचिरा जाधवने दिलं उत्तर

दरम्यान, रुचिराच्या या उत्तराने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात झळकली होती. तसेच यापूर्वी तिने ‘झी मराठी’वरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेत काम केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Big boss fame actress ruchira jadhav reply to trolls after visit at lalbaugcha raja for darshan sva 00

First published on: 24-09-2023 at 18:43 IST
Next Story
Video: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुनची एक भुवई का असते वर? निर्मिती सावंत यांनी सांगितलं त्यामागचं रहस्य