‘बिग बॉस’ मराठी कार्यक्रमात आता एका नवा ट्विस्ट आला आहे. या कार्यक्रमात नुकतीच ४ स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एंट्री झाली. यात आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ, राखी सावंत आणि मागच्या बिग बॉस पर्वाचा विजेता विशाल निकम यांचा समावेश आहे. घरात आल्या आल्या या स्पर्धकांनी घरातील सदस्यांवर आपले मत मांडले. ज्यात मीरा आणि आरोहने अपूर्वा नेमळेकरबद्दल आपले मत सांगितले ज्यावरून अपूर्व भावुक झाली.

मीराने अपूर्वाचे कौतुक केले होते. ती अपूर्वाला असं म्हणाली होती मला तू माझ्यासारखी वाटतेस… जे मनात आहे, जे डोक्यात आलं ते तू तोंडावर बोलतेस आणि मोकळी होतेस. तर दुसरीकडे आरोहने मात्र अपूर्वाबद्दल बोलताना असं म्हणाला की ‘अपूर्वाला खूप गर्व आहे स्वत:बद्दल, तिने तो थोडा कमी करावा. अपूर्वा ज्यापद्धतीने खेळात आहे त्यावरून तिचे सगळेच जण कौतुक करत आहेत. मात्र आरोहच्या वक्तव्यानंतर अपूर्वा भावुक झाली.

How Sudha Murthy cope with menopause
“एकदिवस अचानक मला मुलांची आठवण आली अन् रडू आले”; सुधा मूर्ती यांनी सांगितला मेनोपॉजदरम्यान अनुभवलेला प्रसंग
happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात

स्नेहलता आणि अपूर्वाची मैत्री हळूहळू घट्ट होत आहे. खेळा व्यतिरिक्त देखील त्या दोघी एकमेकींशी बऱ्याच गोष्टी शेअर करताना दिसतात. अपूर्वाने स्नेहलताशी या गोष्टी शेअर करताना दिसून आली. “दोन भिन्न मतांच्या च्या व्यक्ती मला एकाच दिवशी या घरात भेटल्या त्यातील मीराने माझी प्रशंसा केली तर त्याने मला माझा मूळ स्वभाव बदलायला सांगितला, इतकं नाहीना होऊ शकतं. एखाद्या प्रसंगात व्यक्ती रिऍक्ट होते त्याचा अर्थ काहीतरी असं असेल कि ही व्यक्ती दरवेळी अशा पद्धतीने का रिऍक्ट होते? काही लोक मला पाच वर्षांपूर्वी भेटले आहेत त्यांना आज कदाचित धक्का बसला असेल की मी आता कशी रिऍक्ट होत आहे, आता यात पुढे नक्की काय घडणार हे भागामध्ये कळलेच.