टीव्ही अभिनेत्री व गोविंदाची भाची आरती सिंह हिच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. तिचा संगीत सोहळा मंगळवारी रात्री मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला अनेक टीव्ही कलाकारांनी हजेरी लावली होती. अंकिता लोखंडे-विकी जैन, भारती सिंग-हर्ष लिंबाचिया, रश्मी देसाई, युविका चौधरी, देवोलीना भट्टाचार्जी यांच्यासह अनेकजण या कार्यक्रमात उपस्थित राहिले.

आरती सिंह व दिपक चौहान यांच्या संगीत समारंभात एक एक्स सेलिब्रिटी जोडपं पोहोचलं. दोघेही ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच एका कार्यक्रमात दिसले. आरती व दिपकच्या संगीतमध्ये पारस छाब्रा आणि माहिरा शर्मा रेड कार्पेटवर एकाच वेळी पोहोचले. पण दोघांनीही एकमेकांकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. आरती, पारस व माहिरा तिघेही बिग बॉसच्या १३ व्या पर्वात सहभागी झाले होते.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

आरती संगीत कार्यक्रमात पारसने छाब्रा विशाल आदित्य सिंहबरोबर पोज दिली तर माहिरा शर्मा तिचा भाऊ आणि मॅनेजरबरोबर तिथे थांबली. दोघेही एकमेकांपासून अंतर राखून होते आणि रेड कार्पेटजवळ त्यांनी एकमेकांकडे दुर्लक्ष केलं. पारस निघून गेल्यानंतर माहिरा फोटो काढण्यासाठी पोज देताना दिसली.

दरम्यान, पारस व माहिराबद्दल बोलायचं झाल्यास ते दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. चार वर्षे ते सोबत होते, लिव्ह इनमध्येही राहिले होते. बिग बॉस १३ मध्येही ते एकत्र दिसले होते. या शोमधून बाहेर आल्यावरही ते एकमेकांना डेट करत होते, पण २०२३ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं.