scorecardresearch

‘बिग बॉस १६’चं विजेतेपद हुकल्यानंतर शिव ठाकरेच्या आईची प्रतिक्रिया; एमसी स्टॅनचं नाव घेत म्हणाल्या, “माझा लेक जिंकला नाही म्हणून…”

‘बिग बॉस १६’ एमसी स्टॅनबाबत शिव ठाकरेच्या आईची प्रतिक्रिया, काय म्हणाली शिवची आई?

Shiv Thakare bigg boss 16
‘बिग बॉस १६’ एमसी स्टॅनबाबत शिव ठाकरेच्या आईची प्रतिक्रिया, काय म्हणाली शिवची आई?

‘बिग बॉस १६’ या बहुचर्चित शोचा रॅपर एमसी स्टॅन विजेता ठरला. शिव ठाकरे, एमसी स्टॅन दोघं या शोचे टॉप २ स्पर्धक होते. शिवाय घरातील मंडलीचे दोन सदस्य फिनालेला गेल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली होती. एमसी स्टॅन विजेता ठरल्यानंतर त्याचे चाहते अगदी आनंदात आहेत. तर आपला मित्र जिंकल्यानंतर शिवलाही खूप आनंद झाला.

आणखी वाचा – “आता त्या व्यक्तीचं तोंडही बघणार नाही” ‘बिग बॉस १६’चं विजेतेपद मिळाल्यानंतर कोणावर भडकला एमसी स्टॅन?

एमसीने विजेतेपद पटाकावल्यानंतर शिवने त्या मंचावरच घट्ट मिठी मारली. ‘बिग बॉस १६’च्या सुरुवातीपासूनच शिव व एमसीमध्ये घट्ट मैत्री पाहायला मिळाली. संपूर्ण पर्व दोघंही एकमेकांशी प्रामाणिक राहिले. एमसी ‘बिग बॉस १६’च्या ट्रॉफीसाठी अगदी योग्य आहे अशी प्रतिक्रिया शिवने दिली होती.

तर शिवच्या आईनेही एमसी विजेता झाल्यानंतर आपलं मत मांडलं आहे. ‘बिग बॉस १६’चा फिनाले पार पडल्यानंतर पापाराझी छायाचित्रकारांनी शिवच्या आई-वडिलांना घेरलं. यावेळी या दोघांनाही एमसी व शिवबाबत विचारण्यात आलं. तेव्हा शिवच्या आईने आनंद व्यक्त केला. तसेच एमसी स्टॅनबाबतही भाष्य केलं.

आणखी वाचा – “खूप मेहनत घेतो पण…” समीर चौघुलेंच्या वडिलांनी व्यक्त केली ‘ती’ खंत, म्हणाले, “आमचं एकमेकांशी…”

शिवची आई म्हणाली, “मी खूप खुश आहे. माझा मुलगा जिंकला नाही म्हणून काय झालं? माझा दुसरा मुलगा तर हा शो जिंकला. जय महाराष्ट्र.” शिवच्या आईच्या या उत्तराने सगळ्यांचंच मन जिंकलं. शिवला सुरुवातीपासूनच त्याची आई-वडील पाठिंबा देत होते. तसेच तिने शिवला जिंकवण्यासाठी वोट करा असंही प्रेक्षकांना म्हटलं होतं. पण सध्या शिवला चाहत्यांचं मिळत असलेलं प्रेम पाहून त्याची आईही खूश झाली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 17:49 IST
ताज्या बातम्या