कलाकारांच्या अफेअरच्या अफवा किंवा चर्चा या काही नवीन नाहीत. अनेक कलाकारांच्या नात्याविषयी सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते. असाच चर्चेत येणारा कलाकार म्हणजे अंकित गुप्ता.

लोकप्रिय टीव्ही अभिनेता अंकित गुप्ता त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्याच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत असतो. ‘बिग बॉस १६’मध्ये प्रियांका चहर चौधरीबरोबरची त्याची जोडी पसंत करण्यात आली. दोघेही बीबी हाऊसमध्ये एकमेकांचे मित्र असल्याचे म्हटले जात असले तरी शो संपल्यानंतर दोघेही त्यांचे नाते कोणापासून लपवू शकले नाहीत. आजकाल त्यांच्या ब्रेकअपची चर्चा आहे. प्रियांकापासून वेगळे झाल्यानंतर काही दिवसांतच त्याचे नाव एका मिस्ट्री गर्लशी जोडले जाऊ लागले. आता या संपूर्ण प्रकरणावर स्वतः अभिनेत्याने आपले मौन सोडले आहे.

अलीकडेच ‘बिग बॉस १६’फेम अंकित गुप्ताचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो एका मिस्ट्री गर्लबरोबर दिसत होता. त्यानंतर अभिनेत्री प्रियांका चहर चौधरीबरोबरचे त्याचे ब्रेकअप आणि मिस्ट्री गर्लबरोबरच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. अशा परिस्थितीत आता अंकित गुप्ता या अफवांवर संतापला आहे. अभिनेत्याने एक पोस्ट करत अशा चुकीच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे.

अंकित गुप्ताने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक विधान पोस्ट केले आहे. त्यात त्याने लिहिले आहे, एक वेळ अशी येते जेव्हा मौन संमतीसारखे वाटू लागते आणि आता मी त्याच्याशी सहमत नाही. गेल्या काही महिन्यांत, माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल असंख्य स्टोरीज, एडिटोरियल्स आणि अफवा पसरवल्या गेल्या आहेत. कोणत्याही सत्यतेशिवाय, कोणत्याही संदर्भाशिवाय आणि कोणत्याही मर्यादेशिवाय.’

अंकित गुप्ता म्हणाला, “अलीकडेच मला अशा व्यक्तीशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला ज्याला मी ओळखतही नाही, कारण ते एकाच फ्रेममध्ये दिसले होते, जे केवळ हास्यास्पदच नाही तर त्रासदायकदेखील आहे. मी हे अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो, मी एक खाजगी व्यक्ती आहे. मला जे काही शेअर करायचे आहे मी ते शेअर करण्याचा विचार करतो. परंतु, मी ही वाढती संस्कृती स्वीकारणार नाही, ज्यामध्ये कथा रचणे, मला अनोळखी लोकांशी जोडणे किंवा माझे नाव आणि चेहरा वापरून व्ह्युज, लाइक्स आणि लक्ष वेधणे समाविष्ट आहे.’

अंकित गुप्ताने कायदेशीर कारवाई करण्याची दिली धमकी

अभिनेता पुढे लिहितो, “हे फक्त एका व्हिडीओबद्दल नाही. हा व्हिडीओ सतत गोपनीयतेवर होणारे आक्रमण, बेसलेस गॉसिप आणि विचार न करता असा कंटेंट पोस्ट किंवा फॉरवर्ड करणाऱ्यांच्या जबाबदारीच्या पूर्ण अभावाबद्दल आहे. आता माझ्याबद्दल खोटी, अपमानास्पद किंवा आक्षेपार्ह कंटेंट पसरवणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा प्लॅटफॉर्मवर कायदेशीर कारवाई केली जाईल, ज्यामध्ये मानहानीचे खटलेदेखील समाविष्ट आहेत.”

शेवटी अंकितने लिहिले, “सार्वजनिक जीवन असण्याचा अर्थ असा नाही की माझी प्रतिष्ठा ही सार्वजनिक मालमत्ता आहे. मी हे स्पष्ट करतो की मी येथे खेळण्यासाठी नाही, मी माझ्या गोष्टींचे रक्षण करण्यासाठी आहे. म्हणून काहीही प्रकाशित करण्यापूर्वी किंवा फॉरवर्ड करण्यापूर्वी स्वतःला विचारा की ते खरे आहे का, ते आदरणीय आहे का की मूर्खपणाचे आहे?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.