‘बिग बॉस’ फेम अर्चना गौतम सध्या चर्चेत आहे. अर्चनाने काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींचा PA(स्वीय सहाय्यक) संदीप सिंहवर गंभीर आरोप केले आहेत. अर्चनाने सोमवारी(२७ फेब्रुवारी) फेसबुक लाइव्ह केलं होतं. या लाइव्हमध्ये तिने संदीप सिंहवर आरोप केले आहेत. संदीप सिंहने धमकी दिल्याचा आरोपही तिने केला आहे.

प्रियांका गांधींच्या स्वीय सहाय्यका संदीप सिंह मला “दो कौड़ी की औरत” म्हणाला असं अर्चनाने सांगितलं आहे. “रायपूर सत्रादरम्यान संदीपने मला धमकी दिली. जास्त बोललीस तर तुरुंगात टाकेन, असं तो मला म्हणाला”, असा आरोप अर्चनाने केला आहे. संदीप सिंहने अर्चनाला प्रियांका गांधींची भेटही घेऊ दिली नसल्याने अभिनेत्री फेसबुक लाइव्हच्या माध्यम्यातून त्याच्यावर गंभीर आरोप केले. “संदीप सिंहवर संपूर्ण काँग्रेस पक्ष नाराज आहे. महिलांशी तो नम्रपणे बोलत नाही”,असं अर्चना म्हणाली.

MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
Dilip Ghosh comments on Mamata TMC
दिलीप घोष यांच्या ममतांवरील स्त्रीद्वेष्टा टिप्पणीनंतर बंगालच्या राजकारणात वादळ, टीएमसीची थेट निवडणूक आयोगाकडे धाव
rohini acharya lalu yadav
लालू प्रसाद यादव यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; कोण आहेत रोहिणी आचार्य?
Arvind Kejriwal Arrest
अरविंद केजरीवालांच्या अटकेचा फायदा आम आदमी पक्षाला की भाजपाला? जाणून घ्या, त्यामागचे राजकारण

हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांच्या पत्नीला पाहिलंत का? लेकही दिसते फारच सुंदर

“संदीपसारख्या लोकांना पक्षात का ठेवलं आहे? अशा व्यक्तींमुळे काँग्रेस पक्षाचं नुकसान होत आहे. संदीप कोणत्याच महिलेला प्रियंका गांधींची भेट घेऊ देत नाही. प्रत्येक गोष्ट तो प्रियंका गांधींपासून लपवून ठेवत आहे. मला स्वत:ला प्रियंका गांधींची भेट घेण्यासाठी एका वर्षाची वाट बघावी लागली”, असं अर्चनाने फेसबुक लाइव्हदरम्यान म्हटलं आहे. “मी प्रियांका गांधींमुळे काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. संदीप सिंह जर हिंमत असेल तर मला तुरुंगात टाकून दाखव”, असंही अर्चना पुढे म्हणाली.

हेही वाचा>> “बेबी…” पत्नीच्या ‘त्या’ पोस्टनंतर सिद्धार्थ चांदेकरने शेअर केला फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष

अर्चनाने संदीप सिंहवर आरोप केल्यानंतर तिच्या जिवाला धोका असल्याचं अभिनेत्रीच्या वडिलांनी म्हटलं आहे. दैनिक भास्करशी बोलताना अर्चनावर हल्ला होण्याची भीती व्यक्त करत तिच्या वडिलांनी सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. अर्चना बिग बॉस हिंदीच्या सोळाव्या पर्वाच्या टॉप ५ फायनलिस्टपैकी एक होती. तिने २०२२ मध्ये हस्तिनापूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. परंतु, तिला विजय मिळवता आला नव्हता. अर्चना मनोरंजनप्रमाणेच राजकीय क्षेत्रातही सक्रिय असते. बिग बॉसच्या घरातही तिने उत्तम राजकारणी होण्याची इच्छा व्यक्त केली होती.