scorecardresearch

‘बिग बॉस’ फेम प्रियांका चौधरीचा बोल्ड अंदाज; ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss 16: प्रियांका चौधरीचा बोल्ड व्हिडीओ व्हायरल

priyanka coudhary video
प्रियांका चौधरीचा बोल्ड व्हिडीओ व्हायरल.(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘बिग बॉसचं हिंदी’चं सोळावं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं. यंदाच्या पर्वात सहभागी झालेल्या अभिनेत्री प्रियांका चौधरीने टॉप ५ फायनलिस्टमध्ये जागा मिळवली. बिग बॉसच्या ट्रॉफीची प्रबळ दावेदार मानली गेलेली प्रियांका यंदाच्या पर्वाची सेकंड रनर अप ठरली.

‘बिग बॉस’च्या घरात उत्तम खेळीने प्रियांकाने घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही तिची दखल घेण्यास भाग पाडलं होतं. परंतु, अखेर तिला तिसऱ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं. सध्या प्रियांकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांकाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. एका हॉटेलमधील हा व्हिडीओ असून यात प्रियांका बेडशीटमध्ये असल्याचं दिसत आहे.

हेही वाचा>> आदिल खानच्या आईला धमकीचे फोन; राखी सावंत म्हणाली “मुलगा तुरुंगात आहे अन्…”

हेही वाचा>> ‘बिग बॉस’चा विजेता झाल्यानंतर मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेचं काय करणार? एमसी स्टॅनने म्हणाला “आईसाठी…”

प्रियांकाने तीन वर्षांपूर्वी हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता. आता ‘बिग बॉस’मधून प्रसिद्धी मिळाल्यानंतर प्रियांकाचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून यावर चाहते कमेंटही करत आहेत.

हेही वाचा>> “मराठीमधून हिंदीमध्ये आल्याने मला टार्गेट…” ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडताच शिव ठाकरेचा मोठा खुलासा, म्हणाला “मी त्यांची वाट लावून…”

प्रियांका ‘बिग बॉस’च्या घरातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चेहऱ्यांपेकी एक होती. ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसाठीही प्रियांका चौधरी व शिव ठाकरे ही दोन नावे पुढे होती. परंतु, रॅपर एमसी स्टॅनला सर्वाधिक मतं मिळाल्याने तो यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला. त्यामुळे प्रियांकाच्या चाहत्यांनाही धक्का बसला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 16:46 IST
ताज्या बातम्या