scorecardresearch

‘बिग बॉस’ फेम शालिन भानोतची पूर्वाश्रमीची पत्नी दलजित कौरने पुन्हा बांधली लग्नगाठ! नवऱ्याचंही आहे हे दुसरं लग्न

दलजित कौरचं बॉयफ्रेंडसह शुभमंगल सावधान! दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात

shalin bhanot wife second marraige
दलजित कौरचं बॉयफ्रेंडसह शुभमंगल सावधान!(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘बिग बॉस’ फेम शालिन भानोतची पूर्वाश्रमीची पत्नी दलजीत कौर दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली आहे. दलजितने निक पटेलबरोबर लग्नगाठ बांधली आहे. दलजीतने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत दलजित व निकचं लग्न थाटामाटात पार पडलं. लग्नाआधी दलजितच्या हळदी, संगीत व मेहेंदी कार्यक्रमाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नासाठी दलजितने पांढऱ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. लाल रंगाची ओढणी व मॅचिंग ज्वेलरीने दलजितने खास लूक केला होता. तर निकही पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये राजबिंडा दिसत होता.

हेही वाचा>> “नातेवाईक हा प्रकारच मला नकोसा वाटतो” प्रसाद ओकचं वक्तव्य, म्हणाला “माझ्या पत्नीने…”

हेही वाचा>> प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने लेकीच्या लग्नात जावयाकडे मागितलेले तब्बल पाच लाख रुपये, नेमकं काय घडलं होतं?

दलजीतने २००९ साली अभिनेता शालिन भानोतशी लग्नगाठ बांधली होती. दलजित व शालिन २००६ मध्ये पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. तीन वर्षांच्या डेटिंगनंतर विवाहबंधनात अडकून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. परंतु, अवघ्या सहा वर्षांतच त्यांचा संसार मोडला. २०१५ साली घटस्फोट घेत दलजित व शालीन वेगळे झाले. त्यांना जेडन हा मुलगा आहे.

हेही वाचा>> ३० वर्षांनंतर ‘माहेरची साडी २’ येणार? चित्रपटाच्या सिक्वेलबाबत अलका कुबल म्हणाल्या, “मला…”

दलजीतप्रमाणेच निकचंही हे दुसरं लग्न आहे. निक व दलजीत एका फायनान्स कंपनीमध्ये काम करतात. तिथेच त्यांची ओळख झाली. आता विवाहबंधनात अडकून त्या दोघांनीही नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. निकला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 18:22 IST