‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर उपविजेता ठरलेला शिव ठाकरे सोशल मीडियावर चर्चेत आहे. मराठमोळ्या शिवने ‘बिग बॉस हिंदी’मधील सदस्यांसह प्रेक्षकांची मनंही जिंकून घेतली. ‘बिग बॉस’मधून घराघरात पोहोचलेल्या शिवने नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे.

शिवने राज ठाकरेंच्या दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची व कुटुंबियांची भेट घेतली. राज ठाकरे व शिव ठाकरे यांच्या भेटीचं कारण अद्याप समजलेलं नाही. परंतु, शिवतीर्थवरील राज ठाकरेंबरोबरचे शिवचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Yavatmal Washim lok sabha seat, Bhavana Gawali, Rajshree Patil, Campaign for Mahayuti, bhavana gawali with Rajshree Patil, bhavana gawali Campaign, shivsena, lok sabha 2024, election 2024, mahayuti, yavatmal news, washim news, bhavan gawali news, marathi news,
दिल्लीवारी हुकलेल्या भावना गवळी म्हणतात, राजश्री पाटील यांना दिल्लीत पाठवा….
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
truck hit young mens carrying a flame on the occasion of Sacrifice Day
बलिदान दिनानिमित्त ज्योत घेऊन निघालेल्या तरुणांना ट्रकची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

हेही वाचा>> राज ठाकरेंबाबत प्रश्न विचारताच प्राजक्ता माळीचं एका शब्दात उत्तर, म्हणाली…

हेही पाहा>> प्राजक्ता माळीचं दाक्षिणात्य अभिनेत्यांवर आहे क्रश, खुलासा करत म्हणाली “प्रभास आणि…”

‘बिग बॉस’नंतर शिव ठाकरेच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. यंदाच्या पर्वाचा उपविजेता ठरलेल्या शिवला बॉलिवूड अभिनेता सलमान खानने चित्रपटाची ऑफर दिली आहे. शिव लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘रोडिज’ व ‘बिग बॉ’सनंतर आता शिव ‘खतरो के खिलाडी १३’ या रिएलिटी शोमध्ये सहभागी होणार आहे. याशिवाय कंगना रणौतच्या ‘लॉकअप २’ या शोची शिवला ऑफर असल्याचंही बोललं जात आहे.

हेही वाचा>> Video: “८० हजारांचे शूज” व्हिडीओतील ‘त्या’ कृतीमुळे एमसी स्टॅन ट्रोल, नेटकरी म्हणाले “छपरी…”

‘बिग बॉस हिंदी’मध्ये सहभागी होण्याआधी शिव ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाला होता. या पर्वाचा तो विजेताही ठरला होता. त्यामुळे ‘बिग बॉस हिंदी’ची ट्रॉफीही शिव नावावर करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु, रॅपर एमसी स्टॅनला सर्वाधिक मतं मिळाल्याने ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीचा दावेदार मानला गेलेला शिव उपविजेता ठरला.