scorecardresearch

निमृत कौरबरोबरच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर शिव ठाकरेने सोडलं मौन, म्हणाला “माझ्या हृदयात…”

“बिग बॉसच्या घरात…” निमृतबरोबरच्या रिलेशनशिपबाबत शिव ठाकरेचं वक्तव्य

shiv thakare on nimrit kaur
निमृत कौरबरोबरच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर शिव ठाकरेने सोडलं मौन. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मराठमोळा शिव ठाकरे सध्या ‘बिग बॉस’मुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस १६’चा तो फर्स्ट रनर अप ठरला. शिवने पहिल्या दिवसापासूनच त्याचा खेळ दाखवायला सुरुवात केली होती. ‘बिग बॉस’च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी शिव एक होता. घरातील काही सदस्यांबरोबर शिवची चांगली मैत्री झाली होती.

‘बिग बॉस हिंदी’च्या घरात शिवचं नाव निमृत कौर अहुवालियासह जोडलं गेलं होतं. शिव व निमृतच्या नात्याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. त्यांच्यात मैत्रीपलिकडे काहीतरी असल्याचं बोललं जात होतं. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर निमृतने शिवबरोबर फक्त मैत्री असल्याचं म्हटलं होतं. परंतु, शिवने यावर कोणतंही भाष्य केलं नव्हतं. आता अखेर शिवनेही निमृतबरोबरच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत शिवने याबाबत भाष्य करत निमृतबरोबरच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

हेही वाचा>> Video: कॅमेऱ्यासमोर केलेल्या ‘त्या’ कृतीमुळे आर्यन खान पुन्हा ट्रोल, नेटकरी म्हणाले “पोलिसांनी इतकं मारलं…”

शिव म्हणाला, “फक्त रोमँटिक आहे, असं बोलून काही होत नाही. त्यासाठी मनातून आवाज यावा लागतो. हृदयात घंटी वाजावी लागते. निमृत आणि माझ्यातील नातं हे केवळ मैत्रीचं आहे. आम्ही भावनिकदृष्ट्या अनेक गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या आहेत. बिग बॉसच्या घरात माझ्या डोळ्याला दुखापत झालेली तेव्हा तिने माझी खूप काळजी घेतली होती. पण आमच्यात केवळ मैत्री आहे. रोमँटिक नातं असतं, तर ते नातं एकीकडे आणि जग दुसरीकडे…तसं जर असतं तर मी तिच्यासाठी केलेल्या गोष्टी रोमँटिक असत्या. तसं असतं तर आमच्यात आतापर्यंत वेगळ्या गोष्टी सुरू झाल्या असत्या”.

हेही वाचा>> राखी सावंत प्रकरणावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया, म्हणाले “आदिल खानला…”

शिव ठाकरे ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला होता. तेव्हा त्याचं नाव वीणा जगतापशी जोडलं गेलं होतं. वीणा व शिव अनेक दिवस रिलेशनशिपमध्ये होते. परंतु, नंतर त्यांच्यात ब्रेकअप झालं. ‘बिग बॉस हिंदी’च्या ट्रॉफीसाठी शिव प्रबळ दावेदार मानला गेला होता. एमसी स्टॅन व शिवमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. अखेर सर्वाधिक मतांच्या जोरावर रॅपर स्टॅनने बाजी मारत ट्रॉफीवर नाव कोरलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 12:47 IST
ताज्या बातम्या