scorecardresearch

‘बिग बॉस १६’ शिव ठाकरेसाठी ठरलं खास! आता झळकणार सलमान खानच्या चित्रपटात?

त्याचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत.

shiv thakare

शिव ठाकरे सध्या ‘बिग बॉस १६’ या पर्वामुळे चांगलाच चर्चेत आहे. ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये उत्तम खेळ खेळत मराठमोळ्या शिव ठाकरेने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. शिवची घरातील इतर सदस्यांशी असलेली मैत्रीही प्रचंड लोकप्रिय आहे. आता ‘बिग बॉस १६’ चा फिनाले जवळ आला असून शिव ठाकरेच या पर्वाची ट्रॉफी जिंकणार असं अनेकांना वाटत आहे. आता अशातच बिग बॉसमधील त्याने केलेल्या कामगिरीमुळे त्याच्या वाट्याला एक मोठा बॉलिवूड चित्रपट आल्याचं बोललं जात आहे.

‘रोडीज’, ‘बिग बॉस मराठी’ आणि आता ‘बिग बॉस’ हिंदीमधून शिव प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याचा चाहता वर्गही प्रचंड वाढला आहे. टेलिव्हिजन विश्वात लोकप्रिय असलेला शिव ठाकरे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हे कळल्यावर त्याचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा : गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्ने अभिषेक बच्चनची एकदा नव्हे तर दोनदा घेतली दखल; कारण वाचून व्हाल थक्क

टेलिचक्करच्या रिपोर्टनुसार, शिव ठाकरे चक्क सलमान खानच्या चित्रपटात झळकणार आहे. आगामी काळात सलमान खान ‘किसी का भाई किसी की जान’, ‘टायगर 3’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या दोन पैकीच एका चित्रपटात शिवही झळकेल असं बोललं जात आहे. त्या चित्रपटात शिवची महत्वपूर्ण भूमिका असेल. यापैकी नक्की तो कोणत्या चित्रपटात दिसणार आहे हे अद्याप समोर आलेलं नाही.

हेही वाचा : सोशल मीडियावरही शिव ठाकरेचीच हवा! ‘या’ मोठ्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत अभिनेत्याची टीम म्हणाली, “स्वप्न पूर्ण करणं…”

दरम्यान सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून अनेक स्टार्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. अब्दु रोजिकही या चित्रपटात दिसणार हे काही दिवसांपूर्वीच समोर आहे. तर त्यानंतर आता शिव ठाकरे देखील सलमानच्या चित्रपटात दिसणार असल्याचं बोललं जात असल्याने त्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 10:23 IST