‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचं विजेतेपद शिव ठाकरेने पटकावलं. या कार्यक्रमानंतर शिव प्रकाशझोतात आला. हिंदी ‘बिग बॉस’मध्ये जाण्याचं स्वप्न त्याने पाहिलं. शिवने त्याचं हे स्वप्न पूर्ण करत ‘बिग बॉस १६’च्या फिनालेपर्यंत मजल मारली. ‘बिग बॉस १६’चा तो उपविजेता ठरला. त्याच्या चाहत्यांसाठी मात्र तोच विजेता आहे. प्रेक्षकांचं मिळत असलेलं प्रेम पाहून शिव भारावून गेला आहे. आता शिवने एक आनंदाची बातमी दिली आहे.

आणखी वाचा – शिल्पा शेट्टीची आई रुग्णालयात दाखल, अभिनेत्रीने फोटो शेअर करत दिली माहिती, म्हणाली, “शस्त्रक्रिया…”

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
pune crime news, pune fake gst officer fraud marathi news
पुणे : ‘जीएसटी’ अधिकारी असल्याच्या बतावणीने व्यापाऱ्याची लूट

शिवकडे स्वतःची गाडी नव्हती. रिक्षा, बस, ट्रेन किंवा इतर कारने तो प्रवास करायचा. आता त्याने स्वतःची पहिली नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. यादरम्यानचा व्हिडीओ शिवने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. गाडी खरेदी केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर भलताच आनंद पाहायला मिळत आहे.

शिवने नव्या कोऱ्या गाडीचा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “गणपती बाप्पा मोरया. दोन सेकंड हँड गाडीनंतर माझी पहिली नवी कोरी कार. आता या गाडीला धक्का देण्याची गरज नाही”. शिवने नारळ फोडत नव्या गाडीची पुजा केली. शिववर सोशल मीडियाद्वारे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आणखी वाचा – बहिणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “सत्याचा…”

शिवचं आणखी एक स्वप्न या गाडीच्यानिमित्ताने पूर्ण झालं आहे. त्याने टाटा हॅरिअर गाडी खरेदी केली आहे. १५ लाखांपासून ते ३० लाखांपर्यंत या गाडीची किंमत आहे. याआधीच एका मुलाखतीदरम्यान शिवने सांगितलं होतं की, “माझं आयुष्य नक्कीच बदललं आहे. आता मी गाडीही बूक केली आहे. हे सरप्राइज होतं. पहिल्यांदाच मी हे सगळ्यांसमोर सांगत आहे”.