scorecardresearch

Premium

Bigg Boss 16 Finale आधी शिव ठाकरेचं नशीब चमकलं, रोहित शेट्टीकडून मिळाली मोठी ऑफर

बिग बॉस १६ चा स्पर्धक शिव ठाकरेला रोहित शेट्टीने दिलीय मोठी ऑफर

Shiv Thakare in Khatron Ke Khiladi, Shiv Thakare, Rohit Shetty, Khatron Ke Khiladi, Bigg Boss 16 grand finale, Bigg Boss 16, BB 16, Archana Gautam, रोहित शेट्टी, शिव ठाकरे, बिग बॉस १६, खतरों के खिलाडी १३
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

येत्या १२ फेब्रुवारीला बिग बॉस १६ चा महाअंतिम सोहळा आहे. यासाठी आता काही तास उरले आहेत. यंदाच्या सीझनची ट्रॉफी कोण जिंकणार हे लवकरच समजणार आहे. पण त्याआधी प्रेक्षकांचा लाडका स्पर्धक मराठमोळ्या शिव ठाकरेचं नशीब चमकलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने शिव ठाकरेला मोठी ऑफर दिली आहे.

बिग बॉस १६ च्या संपूर्ण सीझनमध्ये शिव ठाकरे विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. अर्थात शिव ठाकरे या सीझनचा विजेता होणार की नाही हे तर काही तासांनंतर समजणार आहेच. पण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याआधीच बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीने मात्र शिव ठाकरेला मोठी ऑफर दिली आहे. महाअंतिम सोहळ्याआधी रोहित शेट्टी बिग बॉस हाऊसमध्ये सर्व स्पर्धकांबरोबर जबरदस्त टास्क करताना दिसणार आहे.

Tharla tar mag fame jui gadkari
Video: ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी मालिकेच्या सेटवर २ ते ४ काय करते? पाहा…
Neha patil winner of dholkichya
कोकणची शान नेहा पाटीलला मिळाला लावणी सम्राज्ञीचा मान; ठरली ‘ढोलकीच्या तालावर’ची विजेती
Aamir khan with ex wife reena
Video: एकमेकांकडे पाहिलं, हसत एकत्र पोज दिली अन्… पहिली पत्नी रीना दत्ताबरोबर दिसला आमिर खान
marathi actress Megha Dhade
“…तर मी ट्रॉफी जिंकले नसते”, अभिनेत्री मेघा धाडेनं बिग बॉसच्या आठवणींना दिला उजाळा

आणखी वाचा- शिव ठाकरे नाही तर ‘हा’ स्पर्धक ठरला ‘बिग बॉस १६’चा विजेता? हातात ट्रॉफी घेतलेला फोटो व्हायरल

रोहित शेट्टी या शोमध्ये टास्क फक्त शोचा एक भाग म्हणूनच करत नाहीये तर त्याचा हेतू खतरों के खिलाडी १३ साठी स्पर्धकांची निवड करणे हा आहे. बिग बॉसच्या आगामी एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित झाला असून रोहित शेट्टी बिग बॉस स्पर्धक शिव ठाकरे, अर्चना गौतम, प्रियांका चौधरी चहर, शालीन भानोत यांना टास्क देताना दिसत आहे. त्यानंतर तो सांगतो की तुमच्यापैकी एकाला खतरों के खिलाडीमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे.

आणखी वाचा- “मराठी माणसाला …” शिव ठाकरेबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यामुळे आरोह वेलणकर ट्रोल, नेटकरी म्हणाले, “त्याची बदनामी…”

रिपोर्ट्सनुसार रोहित शेट्टीने बिग बॉस फायनलिस्टना एकापेक्षा एक कठीण टास्क देताना दिसत आहे. त्यानंतर तो शिव ठाकरेला ‘खतरों के खिलाडी’साठी निवडतो. शिव ठाकरे व्यतिरिक्त खतरों के खिलाडीसाठी अर्चना गौतमचंही नाव समोर येत आहे. बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यांच्या दिवशी रोहित शेट्टी ‘खतरों के खिलाडी १३’च्या पहिल्या स्पर्धकाचं नाव जाहीर करणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bigg boss 16 finale rohit shetty gave offer khataron ke khiladi to shiv thakare mrj

First published on: 11-02-2023 at 10:27 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×