Bigg Boss 16 : 'बिग बॉस १६'मध्ये लवकरच गोल्डन बॉयची एन्ट्री होणार, व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण | bigg boss 16 golden boy sunny waghchoure wild card entry in the house see details | Loksatta

Bigg Boss 16 : ‘बिग बॉस १६’मध्ये लवकरच गोल्डन बॉयची एन्ट्री होणार, व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण

‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये लवकरच नव्या सदस्याची एन्ट्री होणार आहे. तो सदस्य कोण असणार हे आता समोर आलं आहे.

bigg boss 16 wild card entry photos bigg boss 16
'बिग बॉस १६'च्या घरामध्ये लवकरच नव्या सदस्याची एन्ट्री होणार आहे. तो सदस्य कोण असणार हे आता समोर आलं आहे.

‘बिग बॉस १६’चा आता आठवा आठवडा सुरू आहे. सुंबूल तौकीर खानचा जवळचा मित्र फहमान खानने ‘बिग बॉस’च्या घरामध्ये प्रवेश केला. फहमान वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून घरात आला असल्याचं सगळ्यांचा समज होता. मात्र तो ‘धर्मपत्नी’ हा त्याचा शो प्रमोट करण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घरामध्ये आला होता. आता एक वेगळीच व्यक्ती ‘बिग बॉस’च्या घरामध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून येणार आहे. त्या व्यक्तीचं नाव आता समोर आलं आहे.

आणखी वाचा – “विक्रम गोखले व माझे वडील भाऊ नव्हते आणि…” चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर सखी गोखले संतापली

सोशल मीडियावर सतत चर्चेत असताना गोल्डन बॉय अशी ओळख असलेला सनी वाघचौरे ‘बिग बॉस’च्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. त्यानेच इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे खास पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली.

‘बिग बॉस’ लिहिलेला एक फोटो त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला. “अखेरीस माझ स्वप्न पूर्ण होत आहे. ‘बिग बॉस’ एन्ट्री.” त्याच्या या पोस्टनंतर सनी लवकरच ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आणखी वाचा – “अंड्याची भुर्जी व राखी सावंतची मर्जी, ए शेवंते” ‘बिग बॉस मराठीच्या’ घरात प्रवेश करताच ड्रामा क्वीनची डायलॉग बाजी, प्रेक्षक म्हणतात…

सनीने ‘बिग बॉस’शी संबंधित पोस्ट शेअर करताच अनेक जण त्याची एमसी स्टॅनशी तुलना करत आहेत. कारण एमसी स्टॅनही कोट्यवधी रुपयांचे दागिने घालतो. इतकंच नव्हे तर स्टॅन व सनी एकमेकांना फार आधीपासूनच ओळखतात. आता सनी खरंच ‘बिग बॉस’च्या घरामध्ये जाणार का? की हा फक्त प्रमोशनचा भाग आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 17:52 IST
Next Story
‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा साखरपुडा, लवकरच होणार विवाहबद्ध