सध्या सगळीकडे बिग बॉस १६ ची जोरदार चर्चा आहे. सलमान खान आजारी असल्याने या शोच्या होस्टिंगची जबाबदारी काही दिवसांसाठी करण जोहरकडे देण्यात आली आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या ‘विकेंड का वार’मध्ये करण जोहरने घरातील सदस्यांना चांगलंच सुनावलं आहे. सध्या घरात वाद, भांडणं, रुसवे- फुगवे या सगळ्या बरोबरच गौतम आणि सौंदर्या यांचा लव्ह अँगलही पाहायला मिळत आहे. पण करण जोहरने हे नातंच खोटं असल्याचं म्हटलं आहे.

गौतम आणि सौंदर्या अनेकदा बाथरुममध्ये जाऊन एकमेकांशी बोलताना दिसतात. दोघांबद्दल घरातील सदस्यांनीही बिग बॉसकडे अनेकदा तक्रारही केली आहे. पण आता करण जोहरने गौतम आणि सौंदर्याच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्याने या दोघांचं नातं खोटं असल्याचं म्हटलं आहे. तसेच दोघांना चांगलंच सुनावलं. करणने सुरुवातीला गौतम आणि सौंदर्या यांना त्यांच्या नात्याचं स्टेटस विचारलं. पण ते दोघंही काही बोलण्याआधीच करणने घरातील सदस्यांना त्यांच्या नात्याविषयी विचारलं आणि त्यांनी हे नातं खूपच गोंधळात टाकणारं असल्याचं म्हटलं.

indian man killed in canada
कॅनडामध्ये भारतीय तरुणाची हत्या? कारमध्ये आढळला मृतदेह, पोलीस म्हणाले…
Rohit Sharma Akash Ambani spotted together in a car video viral
IPL 2024: रोहित शर्मा आणि आकाश अंबानी एकाच कारमधून प्रवास करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल, नव्या चर्चांना उधाण
Bowlers are allowed to bowl two bouncers in an over batting more challenging in this year IPL What is other rule changes
एका ओव्हरमध्ये दोन बाउन्सर! आयपीएलमध्ये यंदा तुफानी फटकेबाजीला ब्रेक लागेल?
viral video street vendor selling momo burger
Video : बर्गरमध्ये घातले ‘मोमो अन् नूडल्स’! पण जंक फूडच्या या ढिगावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांनी व्हाल चकित

आणखी वाचा- Bigg Boss 16: करण जोहरवर भेदभाव केल्याचा आरोप, सलमान खानकडे सूत्रसंचालन द्या; नेटकऱ्यांची मागणी

सर्वांचं बोलणं ऐकून घेतल्यानंतर करण जोहरने गौतमला, “हे सर्व तू कॅमेरा फुटेजसाठी करत आहेस.” असं म्हटलं. करण म्हणाला, “तुमच्या दोघांचं नातं खरं आहे तर मग तुम्ही माइक परिधान करून बाथरुममध्ये का जाता?” करणच्या मते गौतम आणि सौंदर्या या शोमध्ये पुढे जाण्यासाठी एकमेकांबरोबर असल्याचं नाटक करत आहेत. करणने या नात्याचं सत्य सर्वांसमोर मांडत हे नातं खोटं असल्याचं म्हटलं आहे. करणच्या या बोलण्यावर घरातील सदस्यांनीही सहमती दर्शवली.

आणखी वाचा- Bigg Boss 16 : अब्दू रोजिक वयाने स्वतःपेक्षा मोठ्या असलेल्या ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात, शिव ठाकरे म्हणाला…

गौतम आणि सौंदर्या यांची पोलखोल केल्यानंतर करण जोहर गौतमला म्हणाला, “तुला प्रसिद्ध लोकांबरोबर राहायला आवडतं. तुला जेव्हा कळलं की, अब्दु पहिल्या आठवड्यापासूनच लोकप्रिय आहे. तेव्हा तू त्याच्या आजूबाजूला राहायला सुरुवात केली. त्यानंतर गौतम तुझ्या लक्षात आलं अर्चनाही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होतेय तेव्हा तू तिला तुझ्या रुममध्ये घेतलं. जर सौंदर्या तुझी चांगली मैत्रीण आहे तर तिला का नाही घेतलं.” याशिवाय करण जोहरने शालीन भानोतने सौंदर्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याच्या म्हणण्यालाही दुजोरा दिला.