Video : घट्ट मिठी मारली, किस केलं अन्...; शालीन भानोत व टीना दत्ताचा 'बिग बॉस'च्या घरात खुलेआम रोमान्स, व्हिडीओ व्हायरल | bigg boss 16 romance between shalin bhanot and tina datta video goes viral on social media | Loksatta

Video : घट्ट मिठी मारली, किस केलं अन्…; शालीन भानोत व टीना दत्ताचा ‘बिग बॉस’च्या घरात खुलेआम रोमान्स, व्हिडीओ व्हायरल

शालीन भानोत व टीना दत्ता खुलेआम ‘बिग बॉस’च्या घरामध्ये रोमान्स करत आहेत. यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video : घट्ट मिठी मारली, किस केलं अन्…; शालीन भानोत व टीना दत्ताचा ‘बिग बॉस’च्या घरात खुलेआम रोमान्स, व्हिडीओ व्हायरल
शालीन भानोत व टीना दत्ता खुलेआम 'बिग बॉस'च्या घरामध्ये रोमान्स करत आहेत. यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये दिवसेंदिवस सदस्यांमध्ये एकमेकांबरोबर असलेलं नातं बदलत आहे. सुंबूल तौकीर खान, शालीन भानोत व टीना दत्ता या त्रिकुटाची गेले काही दिवस बरीच चर्चा रंगत होती. पण या तिघांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि सुंबूल शालीन व टीनापासून वेगळी झाली. आता शालीन व टीनामध्ये एक वेगळंच नातं निर्माण होत असल्याचं दिसून येत आहे.

आणखी वाचा – “माझ्या घरातील भांडी घासून घासून हातावरच्या लक्ष्मण रेषा…” राखी सावंतचा अजब दावा, लग्न न होण्यामागचंही सांगितलं कारण

हिंदी कलर्स वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये टीना व शालीन ‘बिग बॉस’च्या घरामध्ये रोमान्स करताना दिसत आहेत. टीना व शालीमध्ये उत्तम मैत्री असल्याचं याआधीही दिसून आलं आहे.

पण या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर आता प्रेमात होत असल्याचं बोलल जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये टीना व शालीन एकमेकांना घट्ट मिठी मारताना दिसत आहेत. तर शालीन टीनाला किसही करतो.

आणखी वाचा – Video : “कोणालाचा झोपू देणार नाही” राखी सावंतचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ड्रामा सुरू, मध्यरात्रीच मागितली कॉफी अन्…

“मी तुला आवडतो का?” असं शालीन टीनाला या व्हिडीओमध्ये विचारताना दिसत आहे. शालीनने प्रश्न विचारताच टीना लाजते. हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. हा वेगळाच ड्रामा आहे, शालीन व टीना प्रेमाचं नाटक करत आहेत अशा प्रेक्षकांनी कमेंट केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 12:44 IST
Next Story
बँकेत नोकरी करून चित्रपटांमध्ये काम करायचे संकर्षण कऱ्हाडेचे वडील, अभिनेत्याच्या भावानेच सांगितला ‘तो’ प्रसंग