scorecardresearch

Bigg Boss 16 : मराठमोळा शिव ठाकरे ग्रँड फिनालेपूर्वीच घराबाहेर पडणार? ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून प्रेक्षकही भडकले

‘बिग बॉस १६’ ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, शिव ठाकरे घराबाहेर पडणार असल्याच्या चर्चा

bigg boss 16 winner bigg boss 16
'बिग बॉस १६' 'तो' व्हिडीओ व्हायरल, शिव ठाकरे घराबाहेर पडणार असल्याच्या चर्चा

‘बिग बॉस १६’ शोचा ग्रँड फिनाले काही अवघ्या सात दिवसांवर आहे. घरातही आता फक्त सात सदस्य उरले आहेत. या सदस्यांमध्ये ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकण्यासाठी चढा-ओढ सुरू आहे. शिव ठाकरे, निमृत कौर, सुम्बुल तौकिर, एमसीस्टॅन, अर्चना गौतम, शालीन भानोत, प्रियांका चौधरी हे सातही सदस्य आता त्यांचा खेळ खेळत आहेत. पण यादरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – सिगारेट व दारू पिण्याबाबत रितेश देशमुखने केलं होतं भाष्य, म्हणाला, “जिनिलीया व मी…”

सध्या सलमान खानच्या जागी करण जोहर या शोचं सुत्रसंचालन करत आहे. ‘बिग बॉस’च्या या शेवटच्या आठवड्यामध्ये घरातील एका सदस्याला घराबाहेर जावं लागणर आहे. कलर्स टीव्ही वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून शिव घराबाहेर पडणार असल्याचं बोललं जात आहे.

पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये ‘बिग बॉस’ची मंडली म्हणजे सुम्बुल, निमृत, शिव व एमसी स्टॅनबाबत करण बोलत आहे. मंडली कोणत्या तरी एका सदस्यामुळे तुटणार असं करण म्हणतो. यावर निमृत मंडली कधीच विभक्त होणार नाही असं बोलते. मात्र घरातील एका सदस्याला बाहेर जावं लागेल असं करण ठामपणे सांगतो.

यावेळी करण शिवकडे बघतो आणि तुला कमी वोट आहेत म्हणून घराबाहेर जावं लागणार असं म्हणतो. तर शिवही घराबाहेर जात असताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रेक्षकांना मात्र राग अनावर झाला आहे. शिव घराबाहेर जाऊच शकत नाही, शिव घराबाहेर पडला तर शो बघणंच बंद करणार, या शोचा विजेताच घराबाहेर कसा पडू शकतो अशा अनेक कमेंट हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 12:25 IST