scorecardresearch

Video: “आपलीच हवा…” भलं मोठं पोस्टर, गाडीवर मिरवणूक अन्…; शिव ठाकरेसाठी अमरावतीत चाहत्यांची रॅली

Bigg Boss 16: शिव ठाकरेच्या समर्थनार्थ अमरावतीत चाहत्यांची रॅली

shiv thakare rally
'बिग बॉस' फेम शिव ठाकरे. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘बिग बॉस हिंदी’चं सोळावं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. यंदाच्या पर्वात मराठमोळा शिव ठाकरेही सहभागी झाला आहे. दिलखुलास व्यक्तिमत्त्वाने शिवने ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांप्रमाणेच प्रेक्षकांचीही मनं जिंकून घेतली आहेत. त्यामुळे यंदाच्या पर्वाची ट्रॉफी शिव ठाकरेनेच जिंकावी अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.

‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाचा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. शिव ठाकरेच्या समर्थनार्थ अमरावतीत रॅली काढण्यात आली होती. शिवचे मोठे पोस्टर तयार करण्यात आले होते. शिवच्या चाहत्यांच्या ग्रुपकडून अमरावतीच्या रस्त्यांवर शिवसाठी गाण्यांवर डान्सही करण्यात आला. फेटा बांधून मराठमोळ्या पद्धतीने शिवच्या चाहत्यांनी त्याला वोट करण्यासाठी आवाहनही केलं.

हेही वाचा>> “माझा हात हातात घेऊन शाहरुख खान…”, सायली संजीवने सांगितलेला ‘तो’ किस्सा

शिवच्या चाहत्यांचा हा व्हिडीओ शिव ठाकरेच्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही या व्हिडीओवर कमेंट करत शिव ठाकरे विजयी व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची लगीनघाई! मेहेंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल

‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाचा अंतिम सोहळा १२ फेब्रुवारीला असणार आहे. प्रियंका चौधरीने टिकट टू फिनाले जिंकत फायनलमध्ये स्थान निश्चित केलं आहे. शिव ठाकरे पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. त्यामुळे आता ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार, हे पाहावं लागेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 12:47 IST